Agripedia

वेलवर्गीय भाजीपाला पिके उदा. कारली, काकडी, चोपडा दोडका, शिरी दोडका, टरबूज इ. पिकांची लागवड बहुतांश ठिकाणी झाली आहे. - वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या शेंड्याकडील बाजूस स्प्रिंगसारखा कुठल्याही आधाराकडे वाढणारा भाग असतो. त्याला आधार देण्यासाठी या पिकांना मंडप किंवा बांबूचा वापर करावा.

Updated on 12 November, 2021 8:09 PM IST

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, गाळ व रेतीचे प्रमाण, वातावरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण यावरून दोन पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवावे. ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे सर्व वेलींना समान पाणी मिळते. तणांचे प्रमाण नियंत्रित राहते. 

संजीवकांची फवारणी : (प्रति १० लिटर पाणी) 

१) जिबरेलिक आम्ल (२५ पीपीएम) २५० मिलि ग्रॅम 

२) नॅप्थॅलिक अॅसिटिक ॲसिड (१० पीपीएम) १०० मिलि ग्रॅम 

अनुकूल परिस्थिती : पिके दोन व चार पानांची असताना मादी फुलांची संख्या वाढावी यासाठी. 

टीप = सध्या पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना अधिक फुले लागावीत यासाठी २५ किलो नत्राची मात्रा द्यावी. 

कीड नियंत्रण=

नागअळी : (Liromyza sative L) 

- प्रादुर्भावास अनुकूल परिस्थिती : वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ६५ ते ७० टक्के चार तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास. 

नुकसानीची लक्षणे :

अळी पानात शिरून अन्नद्रव्य व हरितद्रव्य खाते. पानात नागमोडी चालत असल्यामुळे ती ज्या भागात जातात; तिथे पानात पांढरे चट्टे पडतात. 

- नुकसानीचा प्रकार : प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया मंदावते. अतिप्रादुर्भाव झाल्यास झाड सुकण्याच्या अवस्थेत जाते. उत्पादनात १० ते २० टक्के घट होते. 

-अन्य वर्णन : प्रौढ अत्यंत बारीक असतो. तो पाने खरवडून खातो. ०.४ ते ०.६ मि.मी. इतका बारीक आकारमान असते. जीवनक्रम पानात पूर्ण होतो. 

 

जैविक नियंत्रणाचे उपाय = (प्रति १० लिटर पाणी) 

निंबोळी अर्क (५ टक्के) ४० मि.लि. किंवा 

अझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) १५ मि.लि. 

रासायनिक नियंत्रणाचे उपाय : (प्रति १० लिटर पाणी) 

ट्रायझोफॉस १५ मि.लि किंवा 

प्रोपिकोनॅझोल ५ मि.लि. 

 

कोळी : Tetranicuss spp 

- प्रादुर्भावास अनुकूल परिस्थिती : उष्ण व कोरडे हवामान 

- नुकसानीची लक्षणे : पाने, फुले आदी सर्वच कोवळ्या भागातील रस शोषण करतात. नुकसानग्रस्त पाने अवेळी झडतात. 

- नुकसानीचा प्रकार : तीव्र प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाडाची पाने गळतात. उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होते. 

अन्य वर्णन : हा अष्टपाद कीटक आहे. आकाराने अत्यंत बारीक, लाल, हिरवा व काळ्या रंगाचा असतो. 

रासायनिक उपाय प्रति १० मि.लि. पाणी 

प्रॉपरगाईट (५७ ई.सी.) ५ मि.लि. 

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

९९२३१३२२३३

English Summary: Pay attention to the infestation of insects on valerian vegetables.
Published on: 12 November 2021, 08:09 IST