पेरू कलमांची लागवड ही पावसाळ्यापूर्वी किंवा तीव्र पावसाळा कमी झाल्यावर करावी. त्यासाठी पारंपरिक पद्धती किंवा घन पद्धतीचा अवलंब करता येतो. घन पद्धतीचा अवलंब करताना बुटक्या जाती निवडून, शास्त्रीय पद्धतीने छाटणी तंत्रावर लक्ष केंद्रित करावे.
सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांतही बऱ्याच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.At present, more or less rain is going on in many places including Maharashtra and other states.
हे ही वाचा - कापसाच्या कमी फुलांच्या आणि फुलगळीच्या समस्यांवर मात करा अशी
या वर्षी पावसाळ्यात अधूनमधून बऱ्याच ठिकाणी सतत पाऊस चालू आहे. सध्या अतिवृष्टीच्या क्षेत्रातील पेरू बागांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.अतिवृष्टी झाल्यानंतर बागेत करावयाची उपाययोजना- बागेतील मोकळे पाणी बागेबाहेर काढून द्यावे.
- पाऊस उघडल्यानंतर तणे उपटून जमीन स्वच्छ करावी.- साधारणपणे वापशात वरचेवर मशागत करावी तसेच जमीन जास्त तुडवू नये.- बागेतील रोगट फांद्या काढून नष्ट कराव्यात.- पाला-पाचोळा, कंपोस्ट खत, शेणखत पसरून जमिनीतील मुक्त पाणी कमी करावे. यात सेंद्रिय पदार्थ कुजविणारी जीवाणू खते टाकल्यास सेंद्रीय पदार्थ लवकर कुजण्यास मदत होते.
- बागांना नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खते शिफारशीप्रमाणे द्यावीत.नवीन लागवडीसाठीजमीन - हलकी, मध्यम भारी व भारी जमिनीमध्ये, पाण्याचा उत्तम निचरा असणारी. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ च्या दरम्यान.- सेंद्रिय पदार्थांचे भरपूर प्रमाण आवश्यक- पानथळ व पाणी साठून राहणाऱ्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या, मुरमाड व चुनखडीयुक्त जमिनी पेरू लागवडीसाठी अयोग्य असतात.
डॉ. संजय कोळसे, डॉ. भरत गरड
संपर्क - ०२४२६- २४३३४४
vinod dhongade:
Published on: 25 September 2022, 11:54 IST