वेलवर्गीय भाजीपाला पिके उदा. कारली, काकडी, चोपडा दोडका, शिरी दोडका, टरबूज इ. पिकांची लागवड बहुतांश ठिकाणी झाली आहे.- वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या शेंड्याकडील बाजूस स्प्रिंगसारखा कुठल्याही आधाराकडे वाढणारा भाग असतो. त्याला आधार देण्यासाठी या पिकांना मंडप किंवा बांबूचा वापर करावा.- जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, गाळ व रेतीचे प्रमाण, वातावरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण यावरून दोन पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवावे.
ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे सर्व वेलींना समान पाणी मिळते.Drip irrigation should be used. So all the vines get the same amount of water.
सोयाबीनचे उत्पादन यंदा घटणार? बघा सविस्तर
तणांचे प्रमाण नियंत्रित राहते. संजीवकांची फवारणी : (प्रति १० लिटर पाणी) १) जिबरेलिक आम्ल (२५ पीपीएम) २५० मिलि ग्रॅम २) नॅप्थॅलिक अॅसिटिक ॲसिड (१० पीपीएम) १०० मिलि ग्रॅम अनुकूल परिस्थिती : पिके दोन व चार पानांची असताना मादी फुलांची संख्या वाढावी यासाठी. टीप = सध्या पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना अधिक फुले लागावीत यासाठी २५ किलो नत्राची मात्रा द्यावी.
कीड नियंत्रण= नागअळी : (Liromyza sative L) - प्रादुर्भावास अनुकूल परिस्थिती : वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ६५ ते ७० टक्के चार तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास. - नुकसानीची लक्षणे : अळी पानात शिरून अन्नद्रव्य व हरितद्रव्य खाते. पानात नागमोडी चालत असल्यामुळे ती ज्या भागात जातात; तिथे पानात पांढरे चट्टे पडतात. - नुकसानीचा प्रकार : प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. अतिप्रादुर्भाव झाल्यास झाड सुकण्याच्या अवस्थेत जाते. उत्पादनात १० ते २० टक्के घट होते.
-अन्य वर्णन : प्रौढ अत्यंत बारीक असतो. तो पाने खरवडून खातो. ०.४ ते ०.६ मि.मी. इतका बारीक आकारमान असते. जीवनक्रम पानात पूर्ण होतो.जैविक नियंत्रणाचे उपाय = (प्रति १० लिटर पाणी) निंबोळी अर्क (५ टक्के) ४० मि.लि. किंवा अझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) १५ मि.लि.रसायनिक नियंत्रणाचे उपाय : (प्रति १० लिटर पाणी) ट्रायझोफॉस १५ मि.लि किंवा प्रोपिकोनॅझोल ५ मि.लि.कोळी : Tetranicuss spp
- प्रादुर्भावास अनुकूल परिस्थिती : उष्ण व कोरडे हवामान - नुकसानीची लक्षणे : पाने, फुले आदी सर्वच कोवळ्या भागातील रस शोषण करतात. नुकसानग्रस्त पाने अवेळी झडतात. - नुकसानीचा प्रकार : तीव्र प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाडाची पाने गळतात. उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होते. - अन्य वर्णन : हा अष्टपाद कीटक आहे. आकाराने अत्यंत बारीक, लाल, हिरवा व काळ्या रंगाचा असतो.रासायनिक उपाय प्रति १० मि.लि. पाणी प्रॉपरगाईट (५७ ई.सी.) ५ मि.लि.
विनोद धोंगडे नैनपुर ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
Published on: 26 September 2022, 05:49 IST