Agripedia

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळिराजा मेटाकुटीला आला असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. गेल्या एक दिवसापूर्वी दक्षिण कोकणमध्ये ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे आंबा फळबागयतदार मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

Updated on 23 March, 2022 4:38 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळिराजा मेटाकुटीला आला असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. गेल्या एक दिवसापूर्वी दक्षिण कोकणमध्ये ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे आंबा फळबागयतदार मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

मराठवाड्यात देखील निसर्गाचा लहरीपणा बघायला मिळत आहे परवा पर्यंत तापमानात वाढ होत असतानाच अचानक काल पासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे त्यामुळे तेथील बळीराजा रब्बी हंगामातील पिकांची काढणी करण्यासाठी घाई करत आहे. तर आता खानदेश प्रांतातून एक अजब समस्या समोर येत आहे. खानदेश मधील नंदुरबार जिल्ह्यात पपई उत्पादक शेतकऱ्यांना पुढे एक नवीनच समस्या उभी राहिली आहे.

येथील पपई उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानामुळे खानदेशमधील पपईच्या बागा रोगराईच्या झपाट्यात सापडत आहेत. यामुळे पपई पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट असून पानगळ होत आहे त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्येय प्रत्येक जिल्ह्यात बघायला मिळत असल्याने शेती करायची कशी असा सवाल आता बळीराजा उपस्थित करीत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होईल की काय अशी शंका भेडसावू लागली आहे. जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आधीच हतबल झाला असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पपईच्या बागा जमीनदोस्त केल्या आहेत. जर या हंगामात देखिल पपईच्या उत्पादनात घट झाली तर जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी मेटाकुटीला येईल असे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी वाढत्या तापमानामुळे होणारी पपईची पानगळ तसेच विषाणूजन्य रोगामुळे होणारे पानगळ यामुळे पुरता हैराण झाला आहे. पपईची पानगळ तर होतच आहे मात्र यासोबतच वाढत्या तापमानामुळे पपईची फळे देखील पिवळी पडू लागली आहेत. यामुळे जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा अक्षरशः क्षतीग्रस्त होताना बघायला मिळत आहेत. सध्या जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान नोंदविले जात आहे.

यामुळे रोगामुळे पानगळ झालेल्या पपई झाडावरील फळाला डायरेक्ट उन्हाचा तडाखा बसत असल्यामुळे फळे पिवळी पडत असून खराब होतं आहेत यामुळे अशी फळे झाडावरून काढून फेकावी लागत आहेत. यासाठी शेतकरी बांधवांकडे संरक्षण हाच पर्याय आहे. ज्या पपईच्या बागाचे नुकसान झाले नसेल अशा बागेवर आच्छादन घालणे हाच एक पर्याय असल्याचे कृषी वैज्ञानिक सांगत आहेत.

आच्छादनासाठी झाडावर गोणपाटचा वापर केला जाऊ शकतो. सुरुवातीला पपई पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळाला होता यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना पपई पिकावर वाढत्या तापमानाचा विपरीत प्रादुर्भाव बघायला मिळत असून यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: papaya is ge damaged by temperature scientist advice
Published on: 23 March 2022, 04:38 IST