देशात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जाते. राज्यातही फळबाग लागवडीचा आलेख हा कायम चढता राहिला आहे. फळबाग लागवडीत पपईची लागवड देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यात देखीलखानदेश मधील आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार मध्ये मोठ्या प्रमाणात पपईची लागवड बघायला मिळते.
याशिवाय राज्यात मराठवाड्यात तसेच इतरही भागात थोड्याफार प्रमाणात का होईना पपईची लागवड बघायला मिळते. कृषी तज्ञांनी पपई शेती संदर्भात माहिती देताना सांगितले की, पपईचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्या पैशातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले जाऊ शकते.
हेही वाचा:-शॉर्ट टर्म मध्ये चांगले उत्पन्न हातात देणारे पीक आहे चवळी; उन्हाळी चवळी लागवड ठरेल फायदेशीर
कृषी तज्ञांच्या मते पपई लागवड करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जमिनीचा असतो. जर योग्य जमिनीत पपईची लागवड केली गेली तरी यापासून चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते. पपई लागवड करण्यासाठी सुपीक, मध्यम काळी रेतीमिश्रित पोयटा माती असलेली जमीन सर्वात योग्य असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगत असतात. याशिवाय पपई शेतीमध्ये योग्य व्यवस्थापन करण्याची देखील गरज भासते. पपई लागवड केल्यानंतर पपईच्या खोडाभोवती पाणी साचणार नाही याची शेतकरी बांधवांनी काळजी घेणे अपरिहार्य आहे.
हेही वाचा:-संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे व उपाय योजना
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्या जमिनीत मध्यम ते रेतीमिश्रित पोयटायुक्त माती असेल, त्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी योग्य कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे असते. याशिवाय पपईची लागवड 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या हवामानात करावी असा सल्ला दिला जातो. मित्रांनो पपईचे पीक उष्णकटीबंधात वाढणारे एक फळबाग पीक आहे.
हेही वाचा:-Crop Damage : बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका; केव्हा उबजारी येईल बळीराजा
अधिक माहितीसाठी सांगू इच्छितो की, पपई लागवड करण्यासाठी रोपवाटिकेत बियांपासून रोपे तयार केली जातात. शेतकरी मित्रांनो जर आपणास 1 हेक्टर जमिनीत पपईची लागवड करायची असेल तर आपणांस 250-300 ग्राम बियाण्यांची आवश्यकता भासनार आहे. पपईची जात द्विलिंगी असेल तर मात्र जास्त बियाण्यांची आपल्याला आवश्यक भासू शकते. जर पपईची जात उभयलिंगी असेल, तर कमी बियाणे लागतं असल्याची माहिती कृषी तज्ञ देत असतात.
हेही वाचा:-क्षणात झाले होण्याचे नव्हते, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात
पपईची लागवड करायची असेल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की याची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. मात्र, याची लागवड मुख्यता जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी यामहिन्यात केल्यास चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते.
आपल्या राज्यात मुख्यता पपई लागवड जून-ऑक्टोबर या महिन्यात केली जात असल्याचे सांगितले जाते. शेतकरी मित्रांनो पारंपरिक पीक पद्धतीचा वापर केल्यास नेहमीच उत्पन्न मिळेल, याची कुठलीच हमी नसते. शिवाय पारंपारिक पीक पद्धतीसाठी उत्पादन खर्च देखील अधिक लागतं असतो. यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करणे महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे शेतीतून अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी फळबाग लागवड करण्याचा सल्ला दिला जातो.
हेही वाचा:-मोठी बातमी! वाडा तालुक्यात आयोजित होणार कोकणातलं पहिलं कृषी प्रदर्शन; नितीन गडकरी असणार उद्घाटक
Published on: 24 April 2022, 10:36 IST