Agripedia

मागील जून महिन्यात जवळपास सतत 25 ते 30 दिवस वरून राजाची हजेरी होती.

Updated on 24 August, 2022 12:14 PM IST

मागील जून महिन्यात जवळपास सतत 25 ते 30 दिवस वरून राजाची हजेरी होती. त्यामुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कित्येकांच्या तुर पिकाला फटका बसला. तर काही शेतकऱ्यांची तुर पिक नेस्तनाबूत झाले. सोयाबीन, उडीद,मुंग, या पिकांना सुद्धा पावसामुळे हानी

पोहोचली. काही शेतकऱ्यांची मुगाचे पीक हाती येऊन गेले.The mung bean crop of some farmers has been lost.अशा या सततच्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी व परिसरात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई

द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग होत आहे. तसेच देऊळगाव माळी चे सरपंच किशोर गाभणे यांनी माननीय तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक, यांना निवेदन देऊन संबंधित विभागाला पंचनामे करून तसेच सूचना द्याव्या अशा प्रकारची निवेदन सुद्धा दिली आहे.

मागील जून महिन्यात सतत 25 ते 26 दिवस पाऊस पडल्यामुळे देऊळगाव माळी व परिसरातील शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंग या हाती आलेल्या पिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे संबंधित विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.

 

किशोर विश्वनाथ गाभणे

सरपंच देऊळगाव माळी

English Summary: Panchnama for damage caused due to incessant rains - Kishore Gabhane (1)
Published on: 24 August 2022, 12:14 IST