Agripedia

भारतातील शेती आणि शेती कसणारा बळीराजा काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणात बदलत चालला आहे. देशात आता शेतकरी राजा आधुनिकतेची कास धरून नवनवीन पीक पद्धतीचा अवलंब करीत आहे. यामुळे भारतातील शेती क्षेत्राला एक नवी दिशा मिळत आहे तसेच यामुळे बळीराजाचा फायदा होत असून आर्थिक सुबत्ता बळीराजाला प्राप्त होत आहे. शेतकरी राजा आता मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करत आहे, त्यामुळे बारामाही शेतकरी राजांना उत्पन्न प्राप्त होत आहे. याशिवाय शासन दरबारी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक उपाय योजना विचाराधीन आहेत तसेच अनेक उपाययोजना शासनाद्वारे अंमलात देखील आणल्या गेल्या आहेत. आज आपण खजूर शेती विषयी जाणून घेणार आहोत, खजूर हे देखील नेहमीच मागणी मध्ये असणारे पीक आहे आणि याची लागवड शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

Updated on 29 January, 2022 7:29 PM IST

खजूर हे मुख्यता आफ्रिकी देशात मोठ्या प्रमाणात उगवले जाते, असे असले तरी भारतीय उपखंडात तसेच भारतातील अनेक राज्यांत अलीकडे खजुराची लागवड केली जात आहे आणि खजूर लागवड करणारे शेतकरी यातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करत आहेत. शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की खजूर हे गरम हवामानात येणारे पीक आहे. याशिवाय खजुरच्या वाढीसाठी वाळूमिश्रित असलेली जमीन विशेष उपयोगाची असल्याचे सांगितले जाते. खजूर पिकाच्या वाढीसाठी आपल्या देशातील राजस्थान आणि गुजरात राज्यातील हवामान तसेच शेतजमीन अनुकूल असल्याने येथील शेतकरी आता खजूर पिकाची लागवड करताना नजरेस पडत आहेत. असे असले तरी भारतातील इतर राज्यात देखील आता खजूर लागवडीसाठी शेतकर्‍यांची लगबग नजरेस पडत आहे तसेच यासाठी वेगवेगळे नवनवीन प्रयोग भारतातील बळीराजा करताना नजरेस पडत आहे.

खजूर पिकाच्या वाढीसाठी व त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी खजुराची लागवड मुख्यता कोरड्या हवामानात करण्याची शिफारस कृषीतज्ञद्वारे केली जाते. खजूर शेती मधील सर्वात महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे याची लागवड कोरडवाहू क्षेत्रात आणि नापीक जमिनीत देखील केली जाऊ शकते. याची लागवड ज्या प्रदेशात 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असते अशा ठिकाणी केल्यास त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते.

मात्र या पिकासाठी थंड हवामान अजिबात मानवत नाही. खजूर च्या वेगवेगळ्या जाती उपलब्ध असतात आणि प्रत्येक जातीची लागवड पद्धत ही वेगवेगळी असते. खजूर च्या शेतीतून सुमारे तीन वर्षानंतर उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कृषी तज्ञांच्या मते, खजूर शेतीतून एक लाख रुपये उत्पादन खर्च केले असता जवळपास आठ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते.

English Summary: Palm Farming is very Benificial for Farmers
Published on: 29 January 2022, 07:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)