1. कृषीपीडिया

अकोला जिल्ह्यातील कपाशी पिकामध्ये शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव; असा करा उपाय

KJ Staff
KJ Staff


ऑक्टोबर महिन्यातील वातावरण हे शेंदरी बोंड अळी अळीच्या वाढीस पोषक आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या १७ ऑक्टोंबर २०२० च्या कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे उपविभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.

फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये ८ ते १० पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा झॉडिरेक्टीन ०. ०३ (३००पी.पी.एम) ५० मी.ली. किंवा .१५ टक्के (१५००पी.पी.एम.) २५ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवड केलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम पक्व झालेल्या बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळ्याची संख्या मोजून ती दोन किडकी बोंड किंवा दोन पांढुरक्या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० टक्के) समजून खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब  ७५ टक्के, डब्ल्युपी २५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५टक्के, एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के, प्रवाही २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के, ३०मि.ली. किंवा इंडोक्साकार्ब १५. ८ टक्के, १० मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन २. ८ टक्के, १० मि.ली. या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव १० टक्क्याच्यावर आहे, अशा ठिकाणी आवशकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामध्ये ट्रायझोफॉस ३५ टके + डेल्टामेथ्रीन १टक्के, १७ मि.ली. किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन ४. ६ टक्के ५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के, २०  मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के + ॲसीटामाप्रिड ७..७ टक्के १० मि.ली. किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेतकरी बांधवांना वरील उपाययोजनांबाबत अडचण अथवा मार्गदर्शन हवे असल्यास उपविभागातील क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असेही उपविभागीय कृषी अधिकारी  देवरे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहिम मालेगांव उपविभागातील मालेगांव तालुक्यातील २२,१३३ हेक्टर, सटाणा तालुक्यातील १६६ हेक्टर तर नांदगांव तालुक्यातील ८,२७५ हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असुन कापुस पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत तालुका निहाय शेतकरी मेळावे घेण्यात येवून कृषी संजीवनी सप्ताहात (१ ते ७ जुलै कालावधीत) किड व रोग बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters