Agripedia

मागील काही दिवसात सर्व राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. या वेळी सर्वात जास्त मोठा फटका हा शेतकऱ्यांना आणि पिकांना बसलेला आहे. सर्वात जास्त नुकसान या पावसात कांदा उत्पादक शेतकरी आणि फळबाग उत्पादक शेतकरी यांच झालेला आहे.जोरदार आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे पपई च्या बागांवर रोग पडला आहे. या पावसामुळे पपई वर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पडला असून बागेत मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन पपई चे फळे आपोआप फुटून म्हणजेच उलून खराब झालेली आहेत. त्यामुळं पपई उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणी सापडला आहे.एवढे मोठे नुकसान होऊन सुद्धा कृषी विभागाकडून कोणत्याच प्रकारचे पंचनामे झालेले नाहीत.

Updated on 20 October, 2021 8:20 AM IST

मागील काही दिवसात सर्व राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. या वेळी सर्वात जास्त मोठा फटका हा शेतकऱ्यांना आणि पिकांना बसलेला आहे. सर्वात जास्त नुकसान  या  पावसात कांदा उत्पादक शेतकरी आणि फळबाग उत्पादक शेतकरी(farmer) यांच झालेला आहे.जोरदार  आणि  सतत  पडणाऱ्या  पावसामुळे पपईच्या बागांवर  रोग  पडला  आहे. या  पावसामुळे पपईवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पडला असून बागेत मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन पपई चे  फळे  आपोआप फुटून  म्हणजेच उलून खराब झालेली आहेत. त्यामुळं  पपई  उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणी सापडला आहे.एवढे मोठे नुकसान होऊन सुद्धा कृषी विभागाकडून कोणत्याच प्रकारचे पंचनामे झालेले नाहीत.

पपई बागांची पाने पिवळी पडली आहेत :

नंदुरबार जिल्ह्यात एकूण मिळून 6400 हेक्टर क्षेत्रात पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार हेक्टर क्षेत्र हे शहादा तालुक्यात आहे. अति  आणि  सतत  पडणाऱ्या पावसामुळे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव पपई च्या बागांवर पाहण्यास मिळत आहे.तसेच बागांमध्ये सतत पाणी साचून राहिल्यामुळे बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. बुरशी बरोबरच पपई बागांवर डवणी या रोगाचा सुद्धा परिमाण बागांवर झालेला आहे.रानात सतत पडलेल्या पावसाचे पाणी साठून राहिल्यामुळे पपई बागांची पाने पिवळी पडली आहेत आणि पिवळी होऊन पाने गळायला लागली आहेत. त्यामुळं यंदा च्या वर्षी बागायत दारांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.

बुरशी मुळे आणि डवणी या रोगामुळे संपूर्ण बागा या उद्धव झालेल्या आहेत. गेल्या 4 वर्ष्यात वेगवेगळ्या पडणाऱ्या रोगांमुळे पपई उत्पादक शेतकरी हैराण झालेले आहेत.परतीच्या पावसामुळे पपई बरोबरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि रानात पाणी साचल्याने कांदा हा राणातच सडून गेला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहे त्यामुळे कांद्याचे भाव हे भरमसाठ वाढलेले आहेत.

पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे कांद्याचे उत्पन्न सुद्धा कमी निघाले आहे. वाढत्या मागणीमुळे कांद्याचे भाव वाढतच राहतील. सध्या बाजारात कांद्याला 50 ते 60 रुपये किलो एवढा भाव मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती त्या शेतकऱ्यांना योग्य भाव आणि वाढता मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यबरोबरच अन्य राज्यात सुद्धा पावसासामुळे कांद्याचे उत्पन्न घटले आहे. सणासुदीच्या काळात कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे परंतु आवक कमी असल्याने कांद्याचे भाव वाढतच चालले आहेत.

English Summary: Outbreak of Downy Disease on papaya orchards in Nandurbar, farmers in trouble
Published on: 20 October 2021, 08:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)