Agripedia

शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र चांगल्या उत्पादनासाठी पिकांवरील रोगांची लक्षणे ओळखणे अत्यंत गरजेचे असते. रोगांची लक्षणे ओळखून उपाययोजना कशी केली पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊया.

Updated on 29 July, 2022 12:14 PM IST

शेतकरी (farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र चांगल्या उत्पादनासाठी पिकांवरील रोगांची लक्षणे ओळखणे अत्यंत गरजेचे असते. रोगांची लक्षणे ओळखून उपाययोजना कशी केली पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊया.

बरेच शेतकरी मोसंबी पिकाची लागवड (Cultivation of Mosambi crop) करत असतात. यातून चांगले उत्पादनही घेत असतात. मात्र अचानक पडलेल्या रोगांमुळे उत्पादनात प्रचंड घट होऊन शेतकऱ्यांना नुकसानिस सामोरे जावे लागते.

मोसंबी (Sweet Orange) हे एक महत्त्वाचे फळपीक आहे. महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यांत मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड (Sweet Orange Cultivation) केली जाते.

मोसंबी पिकांवर विविध रोगांचा (Disease On Sweet Orange) प्रादुर्भाव होतो. रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. योग्य वेळी नियंत्रण केल्यास बऱ्याच कालावधीपर्यंत झाडांपासून चांगले उत्पादन मिळते.

हे ही वाचा 
Fertilizers: आता भेसळयुक्त खते एका मिनिटातच समजणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

रोगांचे प्रकार 

1) डिंक्या Gum disease

1) फायटोप्थोरा नावाच्या बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. कलम केलेल्या जागेच्या आसपास बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो.

2) रोगग्रस्त सालीमधून डिंकासारखा चिकट द्रव बाहेर येतो. सालीचा आतील भाग काळपट किंवा भुरकट रंगाचा दिसतो. रोगट साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात.

3) रोगामुळे झाड कमजोर होऊन त्याचे आयुष्यमान कमी होते.

नियंत्रण

झाडाची रोगग्रस्त साल काढून ती जागा पोटॅशिअम परमँगनेट (१ टक्के) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणाने निर्जंतुक करावी. त्यावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. जमिनीत कलम लावताना मुळे व इतर भागांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

ओलित करताना झाडाच्या बुंध्याला पाणी लागू नये यासाठी दुहेरी आळे किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पावसाळ्यापूर्वी किंवा संपल्यानंतर झाडाच्या बुंध्यास नियमितपणे बोर्डो पेस्ट लावावी.

२) पायकूज किंवा मूळकूज Pykooz or root rot disease

1) रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार जमिनीतून होतो.

2) कलमाचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीच्या आत गाडला गेल्याने रोगाचा प्रादुर्भाव होतो.

3) रोगाचा प्रादुर्भाव खोडावर व मुळावर दिसून येतो. जमिनीलगतची साल कुजते.

4) झाडावरील पाने मलूल होऊन पिवळी पडतात व गळतात. फळगळदेखील होते. कालांतराने झाडही वाळते.

नियंत्रण

झाडाची कुजलेली मुळे काढून त्यावर कॉपर ऑक्सिक्लोराइड हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे द्रावण टाकावे. मुळ्या मातीने झाकून हलके ओलित करावे. साधारण २५ ते ३० सेमी उंचीवर डोळा बांधलेली कलमे वापरावीत. दुहेरी आळे किंवा ठिबक पद्धतीने ओलित करावे.

पावसाळ्यापूर्वी व संपल्यानंतर झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट (मोरचूद १ किलो अधिक चुना १ किलो अधिक पाणी १० लिटर) लावावी. सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रतिझाड १० ते २० लिटर या प्रमाणे आळवणी करावी.

हे ही वाचा 
Fish Rice Farming: मत्स्य भातशेतीतून शेतकरी कमवतोय दुप्पट पैसा; जाणून घ्या 'या' शेतीबद्दल

3) शेंडेम Schendem disease

1) कोलेटोट्रीकम, डिप्लोडिया या बुरशींमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

2) रोगाची लागण पावसाळी हवामानात होऊन पावसाळा संपल्यानंतर लक्षणे दिसून येतात.

3) कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून मागे वाळतात व गळतात.

4) वाळलेल्या फांद्यावर काळसर सूक्ष्म गोल ठिपके दिसतात.

नियंत्रण

पावसाळ्यापूर्वी झाडावरील रोगट व वाळलेल्य फांद्या (साल) काढून जाळाव्यात. साल काढल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड (०.३ टक्का) ३ ग्रॅम. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

4) कोळशी cell disease

1) काळ्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर चिकट द्रव साचून त्यावर काळसर बुरशीची वाढ होते, यालाच 'कोळशी' असे म्हणतात.

2) रोगाचा प्रादुर्भाव दमट व उष्ण हवामानात अधिक होतो.

3) प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने, फांद्या, फळे व संपूर्ण झाड काळे पडते.

नियंत्रण

काळ्या किंवा पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट १.५ मिलि अधिक कॉपरऑक्सिक्लोराइड (०.३ टक्का) ३ ग्रॅम. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

महत्वाच्या बातम्या 
RashiFuture: 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता; जाणून घ्या राशिविषयी...
Central Govt Scheme: ...तर घर बसल्या डाउनलोड करा 'हे' कार्ड; सरकार देतंय 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
Post Office: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; लागू झाला 'हा' नवीन नियम

English Summary: Outbreak Diseases Rapid outbreak diseases
Published on: 29 July 2022, 12:00 IST