Agripedia

शेतकरी शिबिर करतात, पुस्तके वाचतात, तंत्रही समजते.पण संपूर्णपणे अवलंब मात्र करण्याचे टाळतात.

Updated on 03 January, 2022 1:30 PM IST

नैसर्गिक शेती मधील संशयी वृत्ती याला कारण असु शकते

संशयी यासाठी की उत्पादन मिळेल की नाही?

जर मिळवायचेच असेल बाजारातून रासायनिक खताची पोती आणायची व विद्यापिठाच्या शिफारशीत टाकायची मग नुसतच पाणी द्यायच. किडी आल्याच तर दुकान आहेतच.

खर्च करण्याची तयारीही आहेच जे मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात त्याचीच किंम्मत वाटते पण नैसर्गिक विषमुक्त शेतीमध्ये खर्च कमी.हे नको यांना

नैसर्गिक शेतीमध्ये भविष्यातील समृध्दीसाठी जे बिजामृत , आच्छादन, घनजीवामृत, जीवामृत, सहजीवन,सापळापिक, याविषयी वैचारिक पातळीचा विचार करण्याची क्षमता असुनही गंभीर नाही.

जे काही नैसर्गिक शेतीच्या नावाने शेती करतात त्यामधील काही ते दिखावू नैसर्गिक शेती करतात...विषमुक्तिच्या नावाखाली जादा दर मिळतो म्हणून दिखावूपणा करणारेही बरेच आहेत

हे लोक दाखवतात एक करतात भलतेच. म्हणजे रासायनिक फवारण्या करायच्या , निविष्ठा नैसर्गिक व रासायनिक भेसळयुक्त वापरायच्या.

आणि अगदी छातीठोकपणे नैसर्गिक शेतमाल म्हणून जादा दराने लोकांच्या माथी मारायचे.पण यामुळे प्रामाणिक नैसर्गिक शेतकरी जो १००% नैसर्गिक तंत्र वापरून शेती करतात त्यांच्यावर अन्याय नाही का?

उद्या जर हे लोकांपर्यंत कळाले तर कोण विश्वास ठेवेल का?

जे नैसर्गिक शेती करतात त्यातील बरेचजण तंत्र समजून न घेता सहजीवन , सापळापिक, आच्छादन, वगैरेचा पत्ताच नसतो फक्त जिवामृत वापरले तर झाले नैसर्गिक....असे त्यांना वाटते मग किडी , रोग येतात मग फक्त जिवामृत वापरून कसा परिणाम मिळणार.

मग उत्पादनच कमी तर नैसर्गिक शेतीवरिल विश्वासही कमी होतो.याला सर्वस्वी शेतकरीच जबाबदार आहेत.

नैसर्गिक शेती तंत्र १००% तंतोतंत राबवले तर रासायनिकपेक्षा जास्तीचे उत्पादन साहजिकच उत्त्पंन्न वाढेल पण याचाच अभाव वाटतो.

नैसर्गिक तंत्रावर विश्वास ठेवून जर शेती केली तर विषमुक्त सकस अन्न मिळेलच.सर्वच माझे मताशी सहमत असतीलच असे नाही, काही लोकांची मते माझ्यापेक्षा वेगळी असू शकतात मी मान्य करतो,

पण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी आपले मत मांडणे सुद्धा महत्वाचे ठरते.

 

गजानन खडके

नैसर्गिक विषमुक्त शेती,महाराष्ट्र.9422657574

English Summary: Out concentrat and in slip farmers position
Published on: 03 January 2022, 01:30 IST