Agripedia

आपली संस्कृती महान आहे मानवतेच्या दृष्टीने असो की पर्यावरणाच्या!

Updated on 24 April, 2022 10:05 PM IST

आपली संस्कृती महान आहे मानवतेच्या दृष्टीने असो की पर्यावरणाच्या!आपन निसर्ग पुजक त्याच बरोबर निसर्गाने दिलेल्या सूचनांचे पालन करतो त्याच निसर्गाने शेती साठी दिलेली देणं म्हणजे कडूलिंब !आपल्या संस्कृतीत कडुलिंबाचे फार मोठे योगदानआहे.राजस्थान मध्ये कडुनिंबाच्या झाडांची पुजा करतात व त्या झाडाचे लाकूड सुद्धा कापत नाही. महत्वाचं म्हणजे कडूिंलबाचे झाड हे नेहमी प्राणवायू वातावरणात सोडत असते.त्याचप्रमाणे मानवाच्या दृष्टीने वातावरणातील घातक असा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असतो.आपले पुर्वज रात्री झाडा खाली कधीच झोपत नसतं त्या मागिल हेच कारण असु शकते. त्या मधे फायद्याची बाब म्हणजे या झाडामुळे धूळ व धूर दोन्हीही अडविले जातात. 

 हे एकमेव झाड आहे कि निसर्ग चक्राच्या विपरीत चालते हीवाळ्यात या झाडाचे पाने गळुन पडतात व उन्हाळ्यात सदैव हिरवेगार राहात असल्यामुळे आपणास नियमित घनदाट व शीतल अशी सावली मिळत असते.बहुउपयोगी असे हे झाड असल्यामुळे शेती क्षेत्रात म्हणा किंवा शेतकरी हीताचे म्हणा या झाडाला महत्त्व प्राप्त झाले आहे. निंबोळी किंवा पानांचा रस असो की अर्क तसेच निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट असे नैसर्गिक कीड,रोग व जिवाणु नियंत्रक आहे.निंबोळी अर्क व निंबोळी तेलाने अनेक प्रकारचे कीड व रोग नियंत्रित होतात. यामुळे एकंदरीत पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होऊन मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.

 या बहुउपयोगी झाडाचा व त्यामधील घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच निंबोळी व तेलाचा कींवा पावडर चां सूत्रकृमी नियंत्रक म्हणून देखील उपयोग करता येतो. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी हे एक वरदान आहे. याशिवाय निंबोळ्या व पाल्याचे खतदेखील अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. कडूनिंब झाडांची पानांमध्ये व बियांमध्ये काही बहुउपयोगी घटक आढळून येतात.

जसे ॲझेटार्क्टिन हा घटक परिणामकारक असून हा घटक किडींना जवळ न येऊ देता त्यांचेमध्ये कायमचअपंगत्व आणून त्यांना संपुष्टात आणण्याचे काम करत असते असतो.हा घटक पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. किडींचा जीवनक्रम संपविण्यासाठी हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.त्याच बरोबर निंम्बीन विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी हा घटक उपयुक्त असल्याकारणाने या घटकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पिकांवरील तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो.त्यामध्ये सालान्नीन हा घटक पिकांवरील पाने खाणार्‍या किडींवर प्रभाविपणे कार्य करतो. तसेच घरातील माश्या, भुंगे, खवले यावरसुद्धा प्रभावीपणे कार्य करतो. एकंदरीत कडूिंलबाच्या पानांपेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा घटक अधिक तीव्र आहे.नियंत्रित होणारे कीटक मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी,

ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी,पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मक्यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी महत्वाचं म्हणजे धान्य साठवणुकीतील किडे, मेंढ्यावरील माश्या कर्दनकाळ आहे या सर्व किडींचासुद्धा प्रादुर्भाव कमी करणसाठी बहुमूल्य अशा या घटकांचा उपयोग होतो. विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी उपयुक्त असल्याकारणाने या घटकाला या कारणांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.पिकांवरील किडी तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती या घटकांमध्ये आढळते. कडूलिंबाच्या अर्काद्वारे किडींच्या नियंत्रण कडूनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंध, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध रोधक, किडीस खाद्यप्रतिबंधक, कीड वाढरोधक व कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम करते.

बहुगुणी वनौषधी म्हणून सुद्धा आयुर्वेदिक मधे महत्वाचं आहे.

 

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

Save the soil all together

मिलिंद जि गोदे

9423361185

milindgode111@gmail.com

English Summary: Our culture introduction is neem milind ji gode
Published on: 24 April 2022, 10:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)