Agripedia

हरितक्रांतीच्या गोंडस नावाखाली वाढत्या कृषीमाल उत्पादनाची फळे चाखतानाच हळूहळू आपल्याला त्याचे विपरीत परिणाम सुद्धा दिसायला सुरुवात झाली आहे. पंजाबातील कॅन्सर ट्रेन, देशातील मधुमेह रुग्णांचा वाढता आलेख तसेच लोकांच्या आरोग्यावर होणारे इतर परिणाम ही त्याची निदर्शके आहेत.

Updated on 11 December, 2021 8:49 PM IST

याचे दुष्परिणाम रासायनिक कृषीमाल सेवन करणारांसोबतच रसायनांचा वापर करून कृषीमाल उत्पादित करणाऱ्या बळीराजाला सुद्धा जीवघेणे परिणाम भोगावे लागत आहेत. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २१ मृत्यू आणि १०० विषबाधित रुग्ण ही एक ताजी घटना आहे. देशातील लोकसंख्या व मूलभूत अन्न गरजा याचा मेळ लावण्याच्या प्रक्रियेमध्ये रसायनांचा वारेमाप वापर करून ही वेळ आपण आपल्यावर ओढवून घेतली आहे.

आज आपल्या आहारात आपण कितीही प्रयत्न केले तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रसायनांचा संबंध येतोच आहे. मग तो फळांच्या, भाज्यांच्या व अगदी दुधाच्या माध्यमातून सुद्धा येतोच आहे. रसायनांच्या दुष्परिणामांची ही दाहकता आज तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर आता आपण थोडे जागृत व्हायला सुरुवात झाली आहे, पण त्याचा वेग पाहता कुठेही ठोस उपाययोजना आपल्याला दिसत नाहीत. शहरांमध्ये विविध मॉल्समध्ये हल्ली ऑरगॅनिक फळे आणि भाजीपाला असा एक स्वतंत्र विभाग पाहतो आणि त्याची किंमत सुद्धा बाकी कृषीमालाच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट असते, जी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसते. या मालाची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे बाजारात तेवढी आवक नसते आणि तेवढे उत्पादन घ्यायला आश्वासक आणि परवडणारे औषध आज बाजारात उपलब्ध नाही.

आपल्या घरातील लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असोत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि याचसाठी के. बी. बायो ऑरगॅनिक्स आता घेऊन आले आहेत वनस्पतीजन्य औषधांची मालिका, जी कृषीमाल उत्पादित करणाऱ्या बळीराजापासून ते अन्न ग्रहण करणाऱ्या आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असा सेंद्रिय कृषीमाल व दूध उत्पादित करण्यासाठी मोलाचा साथीदार ठरतेय. अथक परिश्रम व वैज्ञानिक संशोधनानंतर वनस्पती अर्कापासून आम्ही ही औषधे संशोधित केली आहेत व सर्व तांत्रिक प्रक्रियेतून मान्यता मिळवून बाजारामध्ये दाखल झालो आहोत.

के.बी. बायो. ऑरगॅनिक्सची सर्व उत्पादने ही पूर्णपणे वनस्पतीजन्य असल्यामुळे आपल्या पिकावरील प्रत्येक रोग व किडीवर प्रभावी परिणाम करून याचे पिकावर इतर फायदेसुद्धा होतात. पिकांवर काळोखी येऊन चांगली शाखीय वाढ होते, पिकावर मधमाशी आकर्षित होऊन परागीभवन वाढते व चांगली फलधारणा होते,परिणामी शेतकऱ्याचे उत्पादनसुद्धा वाढते. तसेच आमची औषधे वापरून उत्पादित केलेल्या कृषीमालामध्ये कोणत्याही रसायनाचा अंश आढळत नाही, त्यामुळे हा माल निर्यातक्षम असतो आणि साहजिकच याला दर सुद्धा चांगला मिळतो. सध्या सेंद्रिय शेतीमालाकडे लोकांचा कल पाहता 

व आपल्या आरोग्याची लोक ज्याप्रकारे काळजी घेत आहेत त्यानुसार येत्या काळामध्ये ही उत्पादने सेंद्रिय शेतीसाठी व शेतकऱ्याच्या आर्थिक प्रगतीची गुरुकिल्ली ठरणार आहेत.

 

- शब्दांकन - प्रतिक काटकर 

के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि.

English Summary: Organic farming - looking to the future.
Published on: 11 December 2021, 08:49 IST