शेतीतून उत्पादन व उत्पन्न जास्त मिळावे यासाठी शेतकरी आणि वाटेकरी दोघेही रासायनिक खतांच्या वापरा बाबत आग्रही असतात, जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी वाटेल तेवढा खर्च केला जातो, रगाट डोस केल्यास नादखुळा उत्पादन येते असे आनंदाने बोलले जाते, पण तो गैरसमज आहे हे लक्षात ठेवा.नैसर्गिक शेती करतानी उत्पादन कमी येते हे बर्याच शेतकर्यांच्या मनात कोरल्या गेले आहे.
पन थोडं उत्पादन कमी व जास्त या नादात न पडता सकस आहार,विषमुक्त अन्नधान्य निर्मीती याकडे आपल्याला लक्ष द्यावेच लागेल. विषमुक्त शेती करतानी काही शेतकरी अपयशी होउन पुन्हा रासायनीक शेतीकडेच वळतात.
पण. कुन्याही एका विषमुक्त तंत्रावर अवलंबुन न राहता शेतकर्याने सर्वच विषमुक्त तंत्राचा अभ्यास करुन त्याला ज्यामुळे फायदा होईल त्या तंत्रातील नीवीष्ठा वापरुन विषमुक्त शेती करावी.
जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी आज पंजाब चे उदाहरण सर्वच देतात,शेवटी काय झाले हे सुध्दा सर्वासामोर आहेच. आणि उद्या तुम्ही सुध्दा यातून सुटणार नाही, हे विसरू नका.
मीश्रपीक पध्दती अवलंबल्यास आपले उत्पादन व उत्पन्न कमी होनार नाही.
शेवटी सर्व गोष्टी आपल्या नियोजनावर अवलंबुन असतात.
कधीतरी घुटका, तंबाखू खाताना , सिगारेट ओढताना त्यावर दिलेले कॅन्सर चे चित्र बघत जा, आणि विचार करा आपल्या नंतर आपल्या कुटुंबाचे काय ?
आयुष्याची झिंग आहेच ना, पण ही अशी झिंग परवडणारी नाही,हे सुद्धा रासायनिक खतां सारखेच आहे, नुसते माणसाचे आयुष्य संपवत नाही, तर अनेक नाती आणि पोरं-बाळ रस्त्यावर आणून ठेवते, विचार करा, शेवटी आयुष्य तुमचे आहे, ते असे एका घुटक्यात किंवा सिगारेट मध्ये त्याचा धूर करू नका. नैसर्गिक विषमुक्त शेती मध्येही उत्पादन मनासारखे येऊ शकते, गरज आहे प्रत्येक गोष्ट जी पिकासाठी आवश्यक आहे, ती वेळेत करण्याची
उदाहरण द्यायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे असू शकते
जमिनीची मशागत योग्य वेळी करणे,
उन्हाळ्यात जमीन तापली पाहिजे, म्हणजे किडी कमी होतील, याबरोबरच तिची पाणी घेण्याची क्षमता वाढेल.
कोणतेही पीक लावण्या अगोदर बियाणाला किंवा मुळ्यांना बीजप्रक्रीया करायला विसरू नका, यामुळे बुरशी इतर रोग पीक वाढीत जाणार नाहीत घनजीवामृत टाकताना त्याचे प्रमाण .. जमीन मशागती बरोबर पिकाच्या वाढीप्रमाणे ठरवा, 200 किलो पासून ते 600 किलो पर्यंत, ते पूर्ण तयार होण्यास 45 ते 60 दिवस लागतात एकाच वेळी जास्त घनजीवामृत टाकू नका, ते जमिनीत खत म्हणून नाही तर विरजण म्हणून वापरायचे आहे, हे विसरू नकाजमीन असो किंवा कोणताही सजीव याचे आणि निसर्गाचे नियम सारखेच आहेत, ते कसे ... तर तुम्हाला एकाची वेळी 10 भाकरी खायला दिल्या तर तुमचे काय होईल हा विचार करा, जेवढी भूक असेल तेवढे अन्न खाल्ले तर ते पचेल व अजीर्ण होणार नाही अति प्रमाणात शेणखत टाकल्यास ऊंनी चा पादुर्भाव होईल, आणि अति प्रमाणात घनजीवामृत टाकल्यास ते वाया जाणार, जमिनीला म्हणजे पिकाला जेवढया अन्नद्रव्यांची गरज आहे, तेवढेच घेणार.
जीवामृत,सजीवजल हे प्रत्येक पाण्याला द्या व लगेच शक्य असेल तर, नाहीतर दोन दिवसात जीवामृत फवारणी करा, देशी गायीचेच गोमूत्र वापरा, म्हशीचे मूत्र एकत्र करू नका.
सर्वात महत्त्वाचे आयुष्य आपले आहे हे विसरू नका, ते निरोगी असेल तरच उद्याची पहाट आहे, चला नैसर्गिक विषमुक्त शेतीकडे एक पाऊल निरोगी आयुष्याकडे
गजानन खडके
नैसर्गिक विशमुक्त शेती, महाराष्ट्र
9422657574
Published on: 10 January 2022, 01:35 IST