Agripedia

योग्य जागेची व योग्य जमिनीची निवड करून पुढील प्रमाणे बाबी ह्या काटेकोर पद्धतीने केल्यास

Updated on 13 July, 2022 3:33 PM IST

योग्य जागेची व योग्य जमिनीची निवड करून पुढील प्रमाणे बाबी ह्या काटेकोर पद्धतीने केल्यास भविष्यात येणाऱ्या अडचणींवर सहजपणे मात करता येऊ शकते.जमिनीच्या व लागवडीच्या प्रकारानुसार शेताची योग्य अंतर (६x६ मी. किंवा ३x६ मी) आखणी करून घ्यावी. आखणी करतांना भविष्यात झाडे मोठी झाल्यानंतर बाहेरील चारही बाजूने फवारणी किंवा इतर मशागतीची कामे करण्यासाठी बंधापासून योग्य अंतर सोडावे.उन्हाळ्यात जमिनीचा प्रकार बघून २x२x२ किंवा ३x३x३ फुट आकाराचे खड्डे खोदुन किमान एक ते दीड महिना उन्हात तापू द्यावे 

जेणेकरून लागवडीच्या जागेचे निर्जंतुकीकरण होईल.पावसाळा सुरु होण्यापूर्वी १ भाग चांगले कुजलेले शेणखत किंवा ट्रायकोडर्मा मिश्रित सेंद्रिय खत, २ भाग गाळाची माती, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १ ते २ किलो निंबोळी पेंड आणि ५० ग्राम फॉलीडॉल पावडरचे मिश्रण करून जमिनीच्या अर्धा फुट वरपर्यंत भरावे. या मुळे सुरवातीच्या काळात मुळांची चांगली वाढ होण्यासाठी जमीन हि भुसभुशीत व पोशख राहील. खड्याच्या मधोमध बांबूची काठी रोऊन ठेवावी.

लागवड प्रामुख्याने मान्सूनचा तीन ते चार वेळा पाऊस पडून गेल्यानंतर व जमिनीत तेव्हा योग्य ओलावा राहील तेव्हा करावी. संत्रा कलमांची लागवड करताना ते मुख्यत्वेकरून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना किंवा खड्ड्यात पुरेशी ओल असतांना करावी.कलम लावताना कलमेचा डोळा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवावा.,त्यामुळे जर जोराचा वारा चालू असेल तर डोळा खचण्याचा संभव नसतो. कलम जेव्हा खड्ड्यात लागवडीसाठी ठेवाल तेव्हा ती मूळ स्वभाविक अवस्थेत ठेवून माती हळू हळू खड्ड्यात टा

कावी. नंतर माती हलक्या हाताने दहावी जोरात मातीवर दाब दिल्यास तंतूमुळे तुटण्याची दाट शक्यता असते लागवडीपूर्वी मेटाल्याक्सील +म्यान्कोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.कलम लावतांना डोळा बांधलेली भाग हा जमिनीच्या किमान ६ इंच वर असावा.जेणेकरून याभागास मातीचा आणि पाण्याचा थेट संपर्क होणार नाही कलम लावल्यानंतर कलमांना अंदाजे एक लिटर पाणी देणे द्यावे.शक्यतोवर कलम लागवडीपूर्वी ठिंबक संच लाऊन घ्यावा. 

 

निवृत्ती पाटील, केव्हीके, वाशिम

English Summary: Orange - Scientific cultivation methods
Published on: 13 July 2022, 03:33 IST