Agripedia

शेती मधले उत्पादकता वाढीसाठी कर्ब हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो.

Updated on 16 February, 2022 7:06 PM IST

शेती मधले उत्पादकता वाढीसाठी कर्ब हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो. मात्र. अलीकडे उत्पादनवाढीसाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर होत आहे. दुहेरी तिहेरी पीक घेण्यासाठी शेतकर्याची स्पर्धा अलीकडेच रूजल्याने जमिनी सतत पाण्याखाली राहते. यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी होऊन जमीन नापिक होत आहे. अधिक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांद्वारा बेसुमारपणे रासायनिक खतांचा वापर केला. कीटकनाशकांची फवारणी अधिक होत आहे. मात्र मातीचे परीक्षण करून कमी असलेल्या घटकाचा वापर करीत आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. जमिनीच्या पुनरुज्जीवन सोबत संवर्धनासाठी वास्तविकता जैविक घटकांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. 

मात्र तसे होत नसल्यानं उत्पादन वाढीसाठी भविष्यातील शेती आपल्याला साथ देणार नाही, अशी स्थिती भविष्यात होणार आहे. खतांचा बेसुमार वापर धोक्याचा इशारा देत आहे. मातीचा पोत सुधारण्यासह आधुनिक पद्धतीत परंपरागत शेती पद्धतीची जोड देणे महत्त्वाचे आहे व हे आव्हान शेतकऱ्यांना पेलावे लागेल. माती ही एक प्रकारची जैविक संरचना आहे. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीव असतात. जे हवेतून नत्र व सूक्ष्म अन्नाचे तत्त्व घेऊन मातीला सुपीक करीत असतात. गांढूळासारखे जीवदेखील मातीची गुणवत्ता वाढवीत असतात. मात्र, रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची जैविक संरचना बिघडली आहे. मातीचे नैसर्गिक गुणधर्म कमी होऊन काही ठिकाणी माती कुपोषित झाली आहे. काही ठिकाणी सतत रासायनिक खतांचा वापर अधिक होत असला तरी मातीचे गुणधर्म लोप पावल्याने उत्पादनवाढीमध्ये मात्र उत्पादकता स्थिर झालेली नाही. देशी वाणात रोग प्रतिकारक जास्त क्षमता असते व रोगास कमी बळी पडतात. 

मात्र, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे पिकांची रोग प्रतिबंधक क्षमता कमी होत आहे. कीड रोगांची क्षमता वाढलेली आहे या काळात नियमित पाणी परीक्षण, समृद्धीचे लक्षणं जमिनीची रासायनिक व भौतिक तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये जमिनीचा सामू विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फूरद, पालाश याचे गुणधर्म तपासणीसाठी मातीचे परीक्षण आवश्यक आहे व त्यानुसार सेंद्रीय रासायनिक खतांचा वापर केल्यास पिकांची उत्पादकता वाढेल.नमुना घेण्याच्या पद्धती व माती परीक्षणाचे महत्व त्याची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यत: शेतातील मातीचा नमुना घेण्याचे पद्धतीवर अवलंबून आहे. मातीचा नमुना चुकीच्या पद्धतीने घेतल्यास परीक्षणाच्या इतर पैलूचे महत्त्व कमी होते व त्यापासून अपेक्षित फायदा होत नाही. त्यामुळे मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीने घेणे महत्त्वाचे आहे.जैविक श्रुंखला बाधित रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे जमिनीची पाणी धरण करण्याची क्षमता कमी होत आहे.

कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जैविक श्रुंखलाच बाधित झाली आहे. माणसांसह सर्व गुरांमध्ये याचा अंश पोहोचतो. अगदी आईच्या दुधातदेखील कीटकनाशकांचे अंश आढळल्याचे निष्कर्ष जैविक विभागाच्या संशोधनात आढळून आले आहेत. क्षारतेच्या प्रमाणात वाढबागायती शेतीमध्ये सिंचनासाठी सतत पाळीद्वारे पाणी दिले जात असल्याने जमिनीतील क्षार वाढली आहे. पाणी साठणे, दलदल होणे याचा थेट परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर पाण्याद्वारे या विषाचे अंश नदिनाल्यात पाहोचतात. तसेच कीटकनाशकांचा परिणाम हवेमुळे वातावरण पोहचत आहे.आजचे नियोजन भविष्यात कामी येईल.

 

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल.

मिलिंद गोदे

Mission agriculture soil information

English Summary: Only when we have to nurture a black mother will we become prosperous
Published on: 16 February 2022, 07:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)