Agripedia

पारंपरिक शेती पद्धती मध्ये जास्त कष्ट करून कमी उत्पन्न मिळते शिवाय त्यातून खर्च सुद्धा निघत नाही. परंतु आधुनिक शेती आणि यंत्र सामग्री चा वापर करून जास्त उत्पन्न मिळवू शकतो. त्यामुळं आधुनिक शेती करून उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे.

Updated on 08 April, 2023 2:30 PM IST

पारंपरिक शेती पद्धती मध्ये जास्त कष्ट करून कमी उत्पन्न मिळते शिवाय त्यातून खर्च सुद्धा निघत नाही. परंतु आधुनिक शेती (Modern agriculture) आणि यंत्र सामग्रीचा (Instrument material) वापर करून जास्त उत्पन्न मिळवू शकतो. त्यामुळं आधुनिक शेती (Agriculture) करून उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे.

6 महिन्यात बक्कळ नफा मिळवू शकता

तुम्ही तुमच्या शेतात ही 5 फुटी वनस्पती लावून सहा पट फायदा मिळवू शकता. या साठी  तुम्हाला  जास्त  शेतीची  किंवा  जमिनीची  गरज  सुद्धा  नाही. आज  आम्ही या लेखात अश्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यातून तुम्ही 6 महिन्यात बक्कळ नफा मिळवू शकता.

स्टिव्हीया या औषधी वनस्पतीची  मागणी  झपाट्याने वाढत आहे. या वनस्पतीचा वापर साखरेला पर्याय म्हणून केला जातो. जगात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्टिव्हीयाची मागणी झपाट्याने वाढत आहे.

वनस्पती ची लागवड कोठे केली जाते

या औषधी वनस्पती ची लागवड अनेक देशात केली जाते त्यामध्ये भारत पॅराग्वे, जपान, कोरिया, तैवान, आणि अमेरिका या देशात केली जाते. तसेच भारतातील बंगळुरू, पुणे, इंदूर आणि रायपूर या शहरात सुद्धा या औषधी वनस्पतीची लागवड केली जाते.

या वनस्पतींचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न 

स्टिव्हीया लागवड करण्यासाठी एका एकरात 40,000 रोपे लावली जातात. त्यासाठी कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येतो. या रोपंचो लागवड कमी जागेत सुद्धा केली जाते. यातून मिळणारे उत्पन्न हे पाचपट आहे. शेतामध्ये ऊस कापूस मका यांच्या व्यतिरिक्त जर या औषधी रोपांची लागवड केली तर कमी वेळेत तुम्ही बक्कळ नफा सुद्धा मिळवू शकता.

जर का तुम्हाला रोपांची विक्री करायची असेल तर एका रोपातून तुम्ही 120 रुपये ते 140 रुपये सहजपणे कमवू शकता. कमी खर्चात जास्त उत्पन्न यातून मिळवू शकता.

English Summary: Only one acre of farmland will fetch Rs 6 lakh
Published on: 08 November 2021, 02:29 IST