Agripedia

कांद्याचे भाव वाढले की ते नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या जोरदार उपाय योजना सुरु होतात

Updated on 29 March, 2022 4:40 PM IST

कांद्याचे भाव वाढले की ते नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या जोरदार उपाय योजना सुरु होतात परंतु भाव गडगडले की ते वाढविण्यासाठी उपायही नाही आणि योजनाही नाही.

     प्रथम सरकारला माझी विनंती आहे की किमान पाच पाच वर्षाचे निर्यात धोरण ठरवून कांदा बाजार भावाचे स्थिरीकरण करा. शेतकऱ्याचा कष्टाचा तळतळाट घेऊ नका. काय उपाययोजना करणार आहात एक तर ते तुम्ही सांगा नाहीतर आमचे तरी ऐका.

       तुमच्या मनात असेल की कांद्याला स्थिर बाजार भाव देणार कसा कारण नैसर्गिक हानी झाली तर उत्पादन घटते, नाही झाली तर गरजेपेक्षा जास्त उत्पादन येते, कंपनीत तयार होणाऱ्या उत्पादनासारखं शेतीचे उत्पादन मोजून मापून तयार करता येत नाही, स्थिर बाजारभाव दिला तर शेतकरी अति उत्पादन घेतील आणि पुन्हा जास्तीचा माल कसा विकला जाणार? 

ग्राहकाचं तारण, शेतकऱ्याच मरण हेच तर आजपर्यंत सरकारचं धोरण आलंय. 

         कांद्याला हमीभाव देता येत नसेल तर सरकारने तसं स्पष्ट सांगा. हमीभाव का देता येत नाही याबद्दल तुमच्या शंका सांगा. तुमच्या सर्व समस्यांवर आमच्याकडे उपाय आहे. कांद्यास हमीभाव देण्याची सरकारची इच्छा असेल पण जर मार्ग नसेल तर माझ्याशी चर्चा करा.

 मी ही सरकारवर टीका करत नाही मी शेतकऱ्याचा होणारा कासावीसपणा मांडत आहे, जरा शेतकऱ्याचा तळतळाट बघण्याचा प्रयत्न करा.1500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल भाव लवकरात लवकर जाहीर करा. 

शेतकऱ्यांना माझे आवाहन आहे. तुम्ही साथ द्यायला तयार असाल तर आपण दोनच महिन्यात कांद्यास 1500-3500/-रुपये प्रति क्विंटल भाव मिळवू शकतो. यासाठी जे करायचे आहे ते खूप अवघड नाही. याचेही नियोजन लवकरच मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये असा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे पण आज शेतकऱ्याच्या बेंबीच्या देठाला लागलेली कळ, गळ्याला लागलेला फास आणि डोक्यावरचा कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही का?

   आम्हाला कोणत्याच कर्जमाफीची गरज नाही. आम्हाला फक्त आमच्या कष्टाच्या पिकाला योग्य भाव पाहिजे. भाव तर आम्हाला मिळणारच फक्त तो सरकार देणार की आम्ही मिळवू हे सरकारनेच सांगा. 

हा संदेश प्रत्येकाने आपले आमदार, खासदार व मंत्री यांच्याकडे पुढे पाठवा, आपल्याकडील सर्व ग्रुपला ही पाठवा. आमदार-खासदारांना आपण आपले प्रतिनिधी बनविले आहेफोटो आणि ते प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे पार पाडण्याची त्यांनी शपथ ही खाल्ली आहे. आपण सर्वजण त्यांच्यावर प्रथम विश्वास ठेवू या आणि वाट पाहूया. जे नुकसान होऊ देत नाही तेच सरकार असते. नुकसान झाल्यावर नुकसान पूर्णपणे कधीच भरून निघत नाही.  

मी ही शेतकरी असून हा माझा संताप आहे की जो मी शब्दात मांडला पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच संताप याहीपेक्षा जास्त आहे.आमदार,खासदार आणि मंत्र्यांनो या गोष्टीची वेळीच दखल घेऊन जनतेचे मायबाप व्हा. तुम्ही आमचे प्रिय आहात म्हणूनच तुम्हाला आम्ही निवडून दिले आहेत. शेतकरी तुमच्यासाठी प्रिय असेल तर पुढे या

 शेतकऱ्यांचा विचार झाला नाही तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान शेतकरी ठरवेल .

 

शेतकऱ्यांचा प्रतिनिधी,

प्रा. श्री. विनायक शिंदे

(शेतकरी न्याय संघ संस्थापक अध्यक्ष)

मो.9921083337

English Summary: Only in two months onion will guaranteed price
Published on: 29 March 2022, 04:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)