कोरोनाची लाट येण्याची पुन्हा एकदा शक्यता व्यक्त केली जात असताना आता अजून एक मोठी अडचण समोर आली आहे. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने आपलं डोकं वर आणलाय. वसई-विरार मध्ये महिनाभरापुर्वी बर्ड फ्लू आढळून आला होता.
त्यानंतर पालघरच्या कही भागातही बर्ड फ्लू ने कोंबड्या दगावल्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. आता अशातच या नव्या बातमीने पोल्ट्री व्यावसायिकांना धडकी भरली आहे.
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या सुपौलमध्ये बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळत आहे. छपकाही गावामध्ये काही दिवसांपासून कावळे आणि कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता त्या भागातील पोल्ट्री व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या भागातील कोंबड्या दगावल्या होत्या.
यानंतर पशुसंवर्धन विभागाने केलेल्या तपासात पक्ष्यांना बर्ड फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे.
पशुसंवर्धन विभागाने गावातील एक किलोमीटर क्षेत्रातील कोंबड्यांना मारण्याचं काम सुरू केलं आहे. जेणेकरून बर्ड फ्लू व्हायरस हा इतर परिसरात पसरू नये. तसेच छपकाही गावाच्या 9 किलोमीटर परिसरात तपास सुरू केला आहे. दोन आठवड्यापासून गावातील वॉर्ड नंबर एक ते 11 मधील कोंबड्या, बदक आणि कावळ्यांचा अचानक मृत्यू होत होता.
या भागातून शेजारच्या राज्यात तसेच जिल्ह्यातही कोंबड्या पुरवल्या जातात, त्यामुळे आता या भागातून जिथे कोंबड्या जातात, त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पालघरच्या कही भागातही बर्ड फ्लू ने कोंबड्या दगावल्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. आता अशातच या नव्या बातमीने पोल्ट्री व्यावसायिकांना धडकी भरली आहे.
Published on: 15 April 2022, 09:02 IST