Agripedia

गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झालेली आहे

Updated on 09 October, 2022 3:33 PM IST

गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झालेली आहे परंतु कांद्याचा उत्पादन खर्च 22 ते 25 रुपये इतका येत असताना मागील सलग 8 ते 9 महिने शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल कांदा बाजार समित्यांमध्ये सरासरी 8 ते10 रुपये प्रतिकिलोने विकला गेला आहे यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हजारो कोटींचे नुकसान झालेले आहेनिम्म्यापेक्षाही जास्त कांदा चाळींमध्ये सडून गेल्यानंतर आता कांद्याचा दरात थोडी सुधारणा होत आहे परंतु आता शिल्लक राहिलेला कांदा किमान 60

रुपये प्रति किलो दराने विक्री झाल्यासच शेतकऱ्यांना थोडा फार नफा होणार आहे Farmers will get very little profit only if it is sold at the rate of Rsत्यातही राज्यातील हजारो अल्पभूधारक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा यापूर्वीच 100 टक्के विक्री होऊन गेला आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा

मागील 3 ते 4 वर्षांपासून पावसाळी लाल कांद्याचे नुकसान होत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी लाल कांद्याचा हंगाम हा उशिराने घेण्यास पसंती दिली असून लेट खरीपचा लाल कांदा व रब्बी हंगामातील उन्हाळ्या कांद्याची लागवड मुबलक प्रमाणात होणार आहे लेट खरीपचा लाल कांदा राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डिसेंबर महिन्याच्या

अखेरीस तसेच जानेवारी 2023 च्या सुरूवातीला येण्यास सुरू होणार आहेआता आगाप खरीपचा नवीन लाल कांदा थोड्याफार प्रमाणात बाजार समित्यांमध्ये येणे सुरू राहील परंतु पूर्ण देशाची कांद्याची गरज भागविण्यासाठी चाळींमध्ये साठवून ठेवलेला उन्हाळी कांद्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावेकांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपापला कांद्याची अतिशय चांगली निवड, प्रतवारी करून बाजार समित्यांमध्ये थोडा थोडा करून विक्री करावा जेणेकरून कांद्याची एकदम प्रचंड आवक होऊन आपलीच लूट होणार नाही 

सरकारकडून विविध यंत्रणेमार्फत किंवा वृत्तपत्र व टीव्ही चॅनल, सोशल मीडिया किंवा असंख्य युट्युब चॅनेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवून कांद्याचे दर पाडण्यासाठी नाफेडचा कांदा किंवा बफर स्टॉक कींवा परदेशी कांदा आयात करू या आणि अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जातील परंतु शेतकरी बांधवांनी या अफवांना बळी पडू नयेमहाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या शेकडो व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तसेच फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून कांद्याच्या दैनंदिन घडामोडी बाबत राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अचूक माहिती पुरविली जाईल.

 

भारत दिघोळे

(संस्थापक अध्यक्ष)

-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

English Summary: Onion price hike is not a small compensation for the loss
Published on: 08 October 2022, 09:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)