Agripedia

महाराष्ट्रामध्ये कांद्याचे लागवड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तसे पाहिले तर कांदा हे पीक कमी वेळात चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. परंतु हे पीक वातावरणाला अतिशय संवेदनशील असल्यामुळे बदलत्या हवामानाचा कांदा पिकावर पटकन परिणाम दिसून येतो.धुके, पाऊस अशा नैसर्गिक घटकांचा कांदा पिकावर लागलीच परिणाम दिसतो.

Updated on 16 October, 2021 10:33 AM IST

 महाराष्ट्रामध्ये कांद्याचे लागवड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तसे पाहिले तर कांदा हे पीक कमी वेळात चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. परंतु हे पीक वातावरणाला अतिशय संवेदनशील असल्यामुळे बदलत्या हवामानाचा कांदा पिकावर पटकन परिणाम दिसून येतो.धुके, पाऊस अशा नैसर्गिक घटकांचा कांदा पिकावर लागलीचपरिणाम दिसतो.

 परंतु या सगळ्या समस्या वर जर कांदा पिकाचे योग्य व्यवस्थापन केले तर मात करता येते. कांदा पिकाचे सगळ्यात सामान्य अपने दिसणारा एक प्रकार म्हणजे कांदाचे पात पिवळी पडणे हे होय. या लेखात आपण लाल कांद्याची पात पिवळी पडण्याचा प्रकार जास्त दिसून येतो. त्याची कारणे व करावयाचे उपाय योजना याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 कांद्याचे सड होण्याचे प्रमुख कारणे

  • आपण सर्रासपणे एक लागवड पद्धत म्हणून कांद्याची लागवड करताना त्याचे पात कापून घेतो. अशावेळी पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे या कापलेल्या पातीत पावसाचे पाणी साचले जाते. कालांतराने कांदा पातीचा तो भाग हळूहळू सडायला लागतो आणि शेवटी त्यावर बुरशी येथे व रोप मरते.
  • बहुतांशी कांद्याचे लागवड केल्यानंतर बरेचजण रासायनिक खतांचा पुरवठा जास्त प्रमाणात करतात. बऱ्याचदा या खताचा पुरवठा करताना हे रोप मुळांजवळ पडल्यामुळे किंवा कांदा पिकाच्या दोन पातीच्या मध्यभागी हेखत पडल्यामुळे पात सडते व पर्यायाने रोप मरते. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे कांदा लागवड करण्यापूर्वीच एकरी चार बॅग सुपर फॉस्फेट व एक बॅग पालाश देऊनच लागवड करावी. नंतर लागवड केल्यानंतर पंधरा दिवस कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत देऊ नये.
  • कांदा पिकाला युरियाचा पुरवठा जास्त केला तर रोपांची उंची वाढते पण त्यामुळे पातीला पीळ पडतो.
  • कांदा पातीला पीळ पडल्यामुळे रोपाची वाढ खुंटते.कांदा पिकावर हवामानाचा प्रभाव पडून ही समस्या जास्त आढळते.

यावर उपाय योजना

  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे कांदा लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे काही वेळापुरती कार्बनडेंझिमसारख्या बुरशीनाशक आत बुडवून ठेवावी. शिवाय रूट बूस्टर ची ट्रीटमेंट करावी.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लागवड किंवा कांदा लागवड केलेल्या पिकाला एक महिना युरियाची फवारणी हि करू नये. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कांद्याची बाजूची मुळी वाढ होते पण मधली मुळीनवाढल्यामुळे रोपाला अन्नद्रव्य ग्रहण करता येत नाहीत. त्यासाठी हाय कार्ब, ह्युमिक ऍसिड व चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रेचिंग करावी. ज्या रोपाला पीळ पडल्यामुळे खराबी आले आहे ते उपटूनत्या जागी नवीन रोप लावणेफायद्याचे राहणार आहे.
  • ठिबक वर कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एकरी 250 मिली हुमिक ऍसिड आणि 500 ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट 500 मिली ड्रीप द्वारे सोडावे.
English Summary: onion plant effected to yellow colour and curl this is dengerous disease on onion
Published on: 16 October 2021, 10:33 IST