Agripedia

Onion Farming : मित्रांनो कांदा हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) आहे. या नगदी पिकाची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आपल्या देशातील हवामान कांदा पिकासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असले तरी याची लागवड समशीतोष्ण प्रदेशात बघण्यास मिळते.

Updated on 26 September, 2022 10:44 PM IST

Onion Farming : मित्रांनो कांदा हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) आहे. या नगदी पिकाची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आपल्या देशातील हवामान कांदा पिकासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असले तरी याची लागवड समशीतोष्ण प्रदेशात बघण्यास मिळते.

कांद्याची लागवड आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त नजरेस पडते. हाती आलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्य शीर्षस्थानी आहे. राज्यातील पश्चिम भागात कांदाचे (Onion Crop) सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. नाशिक समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत कांदा लागवड केली जाते.

विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कांदा पिकातून चांगली कमाई करतात. पश्चिम महाराष्ट्र शिवाय राज्यातील विदर्भ मराठवाडा खानदेश तसेच कोकणात देखील कांद्याची लागवड केली जाते. समोर आलेल्या एका सरकारी आकडेवारीनुसार, आपल्या राज्यात जवळपास एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते.

आपल्या राज्यात कांदा एक प्रमुख मुख्य पीक आहे. कांदा पिकावर राज्यातील बहुताशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. अशा परिस्थितीत आज आपण कांदा लागवडीतुन दर्जेदार उत्पादन कसे प्राप्त केले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.

कांदा लागवडीतील काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घ्या बर 

कांदा लागवड ही खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामांत देखील केली जाते.खरीप हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला लाल कांदा म्हणून ओळखला जातो खरीप हंगामातील कांदा जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. रब्बी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला उन्हाळी कांदा म्हणून संबोधला जातो आणि असा कांदा जास्त काळ साठवता येतो.

कांद्याची लागवड रब्बी हंगामात केली असता त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त करता येते, रब्बी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला रोगराईचा धोका कमी असतो. कांद्याची लागवड अशा जमिनीत केली पाहिजे ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो. कांदा पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला दिला जातो.

कांदा लागवड सर्वात महत्त्वाची बाब ठरते ती पूर्वमशागतीची कांदा लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत व्यवस्थितरीत्या करणे महत्त्वाचे ठरते. पूर्वमशागत करताना जमीन नांगरून व्यवस्थित रित्या जमीन समतल करावी लागते.

कांद्याच्या पिकात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी व्यवस्थापनाची. रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची शिफारस केली जाते. काढणीपूर्वी कमीत कमी 20 दिवस अगोदर कांदा पिकाला पाणी देणे बंद करावे. नाहीतर यामुळे कांदा सडू शकतो.

English Summary: onion farming take care of these thing in onion farming details in marathi
Published on: 26 September 2022, 10:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)