Agripedia

भारतात कांदा कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा कर्नाटक आणि महाराष्ट्र ही राज्यात केली जाते. तसेच महाराष्ट्राचे कांदा लागवडीत सर्वात जास्त योगदान आहे. महाराष्ट्रातील विशेषता पश्चिम महाराष्ट्राचे योगदान हे खुप लक्षणीय आहे. कांदा हे पिक भाजीपाला पिकापैकी प्रमुख पिक आहे. कांदा हे प्रामुख्याने एक नगदी पिक आहे, कांद्याचा उपयोग जवळपास प्रत्येक भाजीत, लोणच्यात, तसेच सलाद म्हणुन केला जातो.

Updated on 06 October, 2021 10:04 AM IST

भारतात कांदा कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा कर्नाटक आणि महाराष्ट्र ही राज्यात केली जाते. तसेच महाराष्ट्राचे कांदा लागवडीत सर्वात जास्त योगदान आहे. महाराष्ट्रातील विशेषता पश्चिम महाराष्ट्राचे योगदान हे खुप लक्षणीय आहे. कांदा हे पिक भाजीपाला पिकापैकी प्रमुख पिक आहे. कांदा हे प्रामुख्याने एक नगदी पिक आहे, कांद्याचा उपयोग जवळपास प्रत्येक भाजीत, लोणच्यात, तसेच सलाद म्हणुन केला जातो.

कांदा पिकाच्या उत्पादनात घट येण्याचे सर्वात मोठं कारण हे किड व रोग आहे त्यामुळे कीटक व रोगाचे वेळीचे नियंत्रण करणे हे कांदा पिकाच्या लागवडीतील सर्वात मोठ कार्य आहे. आज आपण कांदा पिकावर लागणाऱ्या अशाच काही रोगाविषयीं व त्याच्या उपचाराविषयीं जाणुन घेणार आहोत. ह्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतात आणि चांगली मोठी कमाई करू शकतात. चला तर मग जाणुन घेऊया कांदा पिकावर आक्रमन करणारे किड, रोग आणि त्यावरील उपचार.

 »काळे डाग

आपल्या महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामात लागवड केलेल्या म्हणजेच लाल कांद्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. कृषी वैज्ञानिकानी सांगितले का हा रोग कोलेटोट्रिकम ग्लोस्पोरिडम बुरशीमुळे होतो. रोगाच्या सुरुवातीला, कांद्याच्या जमिनीलगतच्या पानांच्या बाह्य भागावर करड्या म्हणजे राखाडी रंगाचे ठिपके तयार होतात. जे नंतर मोठे होतात आणि संपूर्ण पानांवर काळे डाग दिसतात. ह्या रोगामुळे प्रभावित पाने कोमेजून जातात आणि वळतात.

नियंत्रण

1.लागवड करण्यापूर्वी, झाडांची मुळे 0.2% कार्बॅन्डाझिम किंवा क्लोरोथॅलोनिलच्या द्रावणात बुडवावीत म्हणजे रोपांवर प्रक्रिया करावी.

  1. कांद्याच्या रोपाची नर्सरी बनवताना उंचीवर बेड बनवावेत.
  2. कांदाच्या नर्सरीत बियाणे पातळ पेरल्या पाहिजेत.

 शेतकरी मित्रांनो अवश्य वाचा -

लसुण लागवड केली असेल तर काळजी घ्या हे दोन किडी ठरत आहेत घातक

 »थ्रिप्स

थ्रीप्स हे एक लहान कीटक आहे, ज्याचे तरुण आणि प्रौढ दोघेही अवस्थामधील किड पानांमधून रस चोखतात. पानांवर पांढरे डाग तयार होतात, जे नंतरच्या टप्प्यात पिवळसर पांढरे होतात. थ्रीप्स हे किड सुरुवातीच्या टप्प्यात पिवळा असतो, जो नंतर गडद तपकिरी रंगाचा होतो.

 नियंत्रण

1.कांदा बियाणे इमिडाक्लोप्रिड 70 डब्ल्यूएस पावडरणे (2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे)  उपचार केल्यानंतर पेरले पाहिजे.

2.मुख्य शेतात कांदा लागवड केल्यानंतर, 1 मिली प्रति लिटरमध्ये 1 मिली डायमिथोएट 30 ईसी किंवा फॉस्फॅमिडॉन 85 ईसी 0.6 टक्के मिसळा आणि 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या करा.

 

»पर्पल ब्लॉच

साधारणपणे हा रोग सर्व कांदा पिकवणाऱ्या भागात आढळतो. हा रोग अल्टरनेरिया पोरी ह्या बुरशीमुळे होतो. हा रोग कांद्याची पात आणि देठावर आढळतो. ह्या रोगाने संक्रमित भागावर पांढरे तपकिरी डाग तयार होतात, ज्याचा मध्य भाग नंतर जांभळा होतो. या रोगामुळे, साठवणी (Storage) दरम्यान कांदा सडण्यास सुरुवात होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते.

 नियंत्रण

  1. कांद्यामध्ये रोग नियंत्रणासाठी प्रतिरोधक प्रजातींचे बियाणे वापरावे असा सल्ला कृषी शास्रज्ञ देतात.

 

2.उळे म्हणजे कांद्याची रोपे पेरण्यापूर्वी  थायरम 2.5 ग्रॅम/कि.ग्रा वापरून बिजप्रक्रिया करून घ्यावी.

3.मुख्य क्षेत्रात या रोगाचा प्रादुर्भाव असल्यास, 2 ग्रॅम क्लोरोथॅलोनिल 75% डायथेन एम -45 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळावे तसेच ह्या द्रवणात 0.01 सांडोविट किंवा कोणत्याही चिकट पदार्थ मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या करणे आवश्यक आहे.

 

English Summary: onion crop disease take immadiate treatment on that
Published on: 06 October 2021, 10:04 IST