कांदा पिकामध्ये कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. कांद्यामध्ये प्रामुख्या ने मर, करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे कांद्यावरील रोग-किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार ओळखून पद्धतींचा अवलंब करावा.
कांदा पिकावरील रोग
काळा करपा
रोगकारक बुरशी
: कोलीटोट्रीकम ग्लेओस्पोराइड्स
(Colletotrichum gloesporoides)
लक्षणे
सुरुवातीला पानाची बाह्य
बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढून पाने वाळतात. कांद्यांची वाढ होत नाही. खरिपात रोपवाटिकेतही रोपांची पाने काळी पडून वाळतात, रोपे मरतात.
उपाययोजना
1. रोपवाटिका गादीवाफ्यावर करावी.
2. पुनर्लागवडीवेळी रोपे कार्बेन्डाझिम किंवा क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.
3. खरिपात कांद्याची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी.
4. शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम प्रति हेक्टर, प्रति ५०० किलो शेणखतात मिसळून वापरावे.
नियंत्रण (फवारणी : प्रतिलिटर पाणी) 5. मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम २ ग्रॅम दर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे.
तपकिरी करपा
1. रोगकारक बुरशी : स्टेमफीलीयम व्हेसिकॅरीयम (Stemphylium
vesicarium
लक्षणे
1. या रोगाचा प्रादुर्भाव कांदा
बियण्याच्या पिकावर होतो.
2. पानाच्या बाह्य बाजूवर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
3. फुलांच्या दांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन वाकून मोडतात.
उपाययोजना
1. पिकांची फेरपालट करावी.
2. प्रादुर्भाव दिसल्यानंतर, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम अधिक स्टिकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने फवारावे.
पांढरी सड
1 रोगकारक बुरशी
रॉल्फसी: स्क्लेरोशियम (Sclerotium rolfsii)
लक्षणे
1. रोपांची पाने जमिनीलगत सडतात. पानांचा वरील भाग पिवळा पडतो. पाने जमिनीवर कोलमडतात. कांद्यावर कापसाप्रमाणे पांढरी बुरशी वाढून त्यावर पांढरे दाणे तयार होतात. कांदा सडतो.
उपाय
1. एकाच शेतात वर्षानुवर्षे कांदा लागवड करणे टाळावे. कांद्याची तृणधान्यासोबत फेरपालट करावी.
2. लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
3. रोपांची मुळे लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात २ मिनिटे बुडवून ठेवावीत.
मूळकूज
1. रोगकारक बुरशी फ्युजरियम ऑक्सिस्पोरम - (Fusarium oxysporum) लक्षणे
2. पाने पिवळी पडतात. पिवळेपणा बुडख्याकडे वाढत जातो. नंतर पाने सुकून कुजतात. मुळे कुजून काळसर तपकिरी होतात. रोप सहज उपटून येते.
उपाय
1. पिकाची फेरपालट करावी. जमिनीची खोल नांगरट करून उन्हाळ्यात तापू द्यावी. थायरम २ ग्रॅम प्रति किलो या बीजप्रक्रियेने फायदा होतो. पुढे प्रादुर्भाव आढळल्यास शेणखतासोबत ट्रायकोडर्मा व्हिरौडी एकरी ५ किलो या प्रमाणात मिसळावे.
Published on: 01 February 2022, 03:55 IST