Agripedia

भारताची अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान अर्थव्यवस्था आहे. जवळजवळ 65 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्याही क्षेत्रावर अवलंबून आहे. भारताचा विचार केला तर शेतीमध्ये बऱ्याच प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातली आहे.

Updated on 16 March, 2022 7:48 AM IST

भारताची अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान अर्थव्यवस्था आहे. जवळजवळ 65 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्याही क्षेत्रावर अवलंबून आहे. भारताचा विचार केला तर शेतीमध्ये  बऱ्याच प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातली आहे.

वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा वापर शेतात होऊ लागल्याने एकंदरीत शेतीच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु आपण जर बारकाईने विचार केला तर एक प्रश्न पडतो की, शेतीत मिळणारे उत्पादन तर वाढले परंतु त्या मानाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व पर्यायाने त्याचे जीवनमान सुधारले का? तर या प्रश्नाचे उत्तराचाजर शोध घेतला तर दिसते की बहुतेक शेतकरी अजूनही आर्थिक मागासलेपण आतच आहेत.  मग काय असू शकते या मागील कारण? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे पिकविलेला शेतमाल व त्याची विक्री व्यवस्था यामध्ये  सापडते. असे माझे मत आहे. होतं काय की शेतकरी पिकाची लागवड करताना आपल्या आजूबाजूचा परिसर व त्यात झालेली पिकांची लागवड तसेच लागवड केल्या जाणाऱ्या पिकांची बाजारपेठ म्हणजे जेव्हा आपली पीक बाजारात येईल तेव्हा त्याचपिकाची आवक येणाऱ्या दिवसात किती प्रमाणात होऊ शकते या गोष्टीच्या अभ्यासाचा अभाव यामध्ये सापडते. त्यामुळे बऱ्याचदा एकाच पिकाची लागवड वाढल्याने एकाच वेळी संबंधित शेतमालाची आवक वाढते व बाजारभाव पडतो.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच परंतुबाजारपेठेत न्यायचा  वाहतूक खर्चही निघत नाही.त्यामुळे अक्षरशहा शेतीमाल रस्त्यात फेकून द्यायची वेळ येते..

एका शेतकऱ्याचे अनुकरण दुसऱ्यांनी करणे

 यामागे दुसरे कारण असे दिसून येते की एखाद्या हंगामात एखाद्या शेतकऱ्याने एखादे पीक लावलेव त्याला अपेक्षेपेक्षा खूपच भाव मिळाला तर आजूबाजूचे नव्हे तर परिसरातील बरेच शेतकरी तेच पिक लावतात. पण हे करताना शेतकरी त्या पिकाच्या सध्याच्या लागवड क्षेत्राचा विचार करत नाही. त्यामुळे होते असे की आवक वाढून बाजार भाव पडतो.

 शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती

 बरेच शेतकरी बंधूंची आर्थिक परिस्थितीही बेताची असते.शेतीशिवाय दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने आर्थिक निकड भागवण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतमालाशिवाय पर्याय राहत नाही.कौटुंबिक खर्च, पुढील हंगामासाठी शेती साठी लागणारे भांडवल, घेतलेले कर्ज फेडणे त्यामुळे शेतमाल घरात आल्यावर  

बऱ्याचदा शेतकऱ्यांना आहे त्या भावात विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. नेमक्या याच गोष्टीचा फायदा बऱ्याचदा व्यापारी घेताना दिसतात.अगदी परवडत नाही तरीसुद्धा शेतकऱ्याला शेतमाल नाईलाजाने कमी भावात विकावा लागतो. हेदेखील एक महत्त्वाचे कारण उत्पादन वाढले परंतु शेतकऱ्याचे उत्पन्न नवाढण्यामागे ठरू शकते.

English Summary: one important anaylysis on farmer financial situation and his some fault in crop cultivation
Published on: 16 March 2022, 07:48 IST