Agripedia

mission agriculture soil information हे माझ्या शेतकरी बांधवांना माहिती पोहचवण्यासाठी एक छोटा प्रयत्न आहे. कर्ब वाढवण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात ?

Updated on 19 January, 2022 12:45 PM IST

mission agriculture soil information हे माझ्या शेतकरी बांधवांना माहिती पोहचवण्यासाठी एक छोटा प्रयत्न आहे. कर्ब वाढवण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात ? कोणत्याही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फक्त शेणच का उपयुक्त धरायचं ? शेती मधला पाला तणकट अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे का?.

 माझ्या पुढे असा प्रश्न पडायचा शेणाचे कुजून खत होते , पण पाळापाचोळ्याचे खत कसे काय होते. म्हणजे निसर्गाने काही सजीवांना हे काम वाटुन दिलेले आहे. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे हे सजीव तो पदार्थ खातात. त्यांची विष्ठा व मृत शरीरे म्हणजे तपकिरी रंगाची भुकटीसारखा दिसणारा पदार्थ ज्याला आपण शेणखत किंवा कंपोस्ट असे म्हणतो.

आमच्या सारख्या शेतकरी वर्गाची पालापाचोळ्यापेक्षा शेणखतावर जास्त विश्वासआहे. शुद्ध शेणापासून तयार झालेले खत म्हणजे सर्वांत उत्तम खत आहे . पालापाचोळ्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत म्हणजे दुय्यम दर्जाचे अशी एक आपली मानसिकता तयार झाली आहे. शेणाचा मूळ स्रोत वनस्पतीच आहे. कोणताही वनस्पती किंवा प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. आजवर शेताच्या बांधावरील झाडांच्या फांद्या जळणासाठी तोडल्या जातात. मोठ्या आकाराचे लाकूड जळणासाठी बाजूला काढून शेंड्याच्या लहान आकाराच्या फांद्या व पाने गाडीत भरून शेतातील एखाद्या मोकळ्या कोपऱ्यात फेकून दिले जाते. पुढे ती तेथेच कुजून संपून जातात परंतु त्यापासून खत होऊ शकेल, असे बरेच दिवस लक्षात आले नाही. वरील अभ्यास झाल्यानंतर अशा लहान फांद्या घराकडे न आणता शेती मधे पसरवून देणे पुढे पावसाळ्यात त्याचे खत होऊन ते अवशेष जिवाणू साठी उपयुक्त आहे याचे हे एक उदाहरण. शेणखत चा वापर योग्य रीतीने केला तर !

मी विचार करीत होतो की आता आपण शेणखत व शेती मधून निघणारं पिकांचे जसे पर्हाटी तुर्हाटीचे खोड रानातच कुजवले तर पण ही खोडाचे सेंद्रिय खत तयार होते ते बाहेर जाळण्यासाठी न जाता ते आपल्या साठी खताचे प्रमाण वाढवते. ही प्रक्रिया शेतामध्ये करणे शक्य होते व थोडा सेंद्रिय कर्ब वाढविताना मदत होईल. व पुन्हा यावर खूप विचार केल्यावर असे वाटले की आता रोटावेटर मारून जमीन नांगरली तर ही खोड रानात बारीक होऊन पडेल व पुढील कामात अडथळा न करता मग खोडाला तसेच जागेवरच ठेवून कोणतीही मशागत करताना पुढील पीक घेता आले तरच हे खोड जागेवर कुजविणे हे शक्‍य होईल.

 आपण बैलाकडून ट्रॅक्‍टरकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांचा मशागत जास्त करणेकडे कल वाढत गेला. मुळात नांगरणीचा उद्देश काय असावा, यांचा शोध घेणे गरजेचे होते. शेतीशास्त्राच्या पुस्तकात नांगरणी चांगली कशी करावी याची माहिती मिळेल, मूळ उद्देश सापडणार नाही. चिंतन केल्यानंतर मला सापडलेले मूळ उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

 आपल्याला बी पेरता आले पाहिजे.

ओळीत करावयाचे असेल तर 

शेतीबांधणीसाठी नांगरणी

दुय्यम उद्देश

तण मारणे

 सेंद्रिय खत मातीत मिसळणे

या उद्देशासाठी आपण जमिनीची मशागत करीत असतो.आपण शेतकऱ्यांना विचारल्यास शेतकरी सांगतील की पुढील पिकाच्या मुळांच्या चांगल्या वाढीसाठी जमीन भुसभुशीत करणे गरजेचे आहे. जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था मारणेसाठी नांगरणी गरजेची आहे. परंतु आता तसे नाही. शेती चे कामे आपण बिना नांगरता करू शकत असतो तर आपल्याला नांगरणी व पूर्वमशागत करण्याची कोणतीच गरज पडली नसती. सुरवातीला आपन मशागत करीत होतो. आता काळ वेळ बदलेल आहे पाणी पाजण्यासाठी जुन्या व नविन सरी-वरंबे पद्धत वापरले जातात. तण मारण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. चांगले कुजलेले खत आता वापरणे बंद केले आहे. शक्‍य झाल्यास जनावरांचे शेण विसकटून आच्छादनात टाकले जाते. सेंद्रिय खताची गरज प्रामुख्याने मागील पिकाचे अवशेष व तणांचे अवशेष जागेलाच कुजवून भागविली जाते. इथे सेंद्रिय खत मुद्दाम औजाराने मातीत कालविण्याचे कामच करावे लागत नाही. शेती कामे चालू आहे व शेतकरी आहे तेथेच आहे.

 

मिलिंद जि गोदे

९४२३३६११८५

English Summary: One aim our soil correct management
Published on: 19 January 2022, 12:45 IST