Agripedia

दूधामध्ये पाणी मिसळणे ही सामान्य तक्रार असते. यासाठी दुधाचा एक थेंब गुळगुळीत स्वच्छ उभ्या पृष्ठभागावर लावला तर शुध्द दुध तेथेच ठिपक्याप्रमाणे राहते.

Updated on 06 May, 2022 12:39 PM IST

किंवा खाली ओघळून पांढरा पट्टा दिसतो. मात्र पाणी घातलेले दुध ताबडतोब खाली ओघळते आणि त्याचा ओघळ पांढरा दिसत नाही.दुधामध्ये युरीया हे खत मिसळण्याची धास्ती मोठया प्रमाणावर असते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये पाच मि.ली. दूध घेऊन त्यात ब्रोमोथायमॉल या निळया औषधाचे दोन थेंब टाका. दहा मिनिटांनंतर निळा रंग आल्यास यात युरीया आहे असे समजा.दुधामध्ये स्टार्च म्हणजे कांजी घातलेली तपासायची असल्यास दुधात 2-3 थेंब टिंक्चर आयोडिन टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्चची भेसळ आहे असे समजावे.

दुधामधून फॅट (चरबी) काढून घेतली असल्यास लॅक्टोमीटरने 26 च्या वरती रिडिंग येते. पण दुध घट्टच दिसते.खव्यामध्ये कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. खव्याचा थोडा नमुना पाण्यात उकळावा,थंड करावा आणि त्यात आयोडिनचे थेंब टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च आहे (पिठूळ पदार्थ) असे समजावे.पनीरमध्येही कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. यासाठी अशीच तपासणी करावी.तुपामध्ये शिजवलेल्या बटाटयाचा किंवा रताळयाचा गर मिसळला जातो. याची तपासणी खव्याप्रमाणेच आयोडिनचे थेंब टाकून करता येते.

शुध्द तूप किंवा लोण्यात वनस्पती तूप भेसळ केले जाते. हे तपासण्यासाठी तूप किंवा लोण्याचा एक मोठा चमचाभर नमुना घेऊन तो गरम करा. एका छोटया वाटीत हा नमुना घेऊन त्यावर तेवढेच हायड्रोक्लोरिक आम्ल ओता आणि त्यातच एक चिमूटभर साखर टाका. हे मिश्रण थोडे हलवा आणि 5 मिनिटे स्थिर ठेवा. या मिश्रणात खालच्या बाजूला नारिंगी थर दिसल्यास वनस्पती तूपाची भेसळ आहे असे समजा.

आईसक्रीममध्ये धुण्याची पावडर मिसळली जाते. अशा आईसक्रीममध्ये लिंबाचे काही थेंब टाकल्यास बुडबुडे येतात. धुण्याची पावडर नसेल तर बुडबुडे येत नाहीत.आईसक्रीमध्ये साखरेऐवजी सॅकॅरीन मिसळलेले असल्यास चवीवरून ते कळते.सॅकॅरीनची गोड चव जीभेवर बराच वेळ राहून नंतर एक कडवट चव शिल्लक राहते.

 

Nutritionist & Dietician 

Naturopathist

 Dr. Amit Bhorkar 

 whats app: 7218332218 

English Summary: Once read, adulteration of milk and dairy products
Published on: 06 May 2022, 12:39 IST