Agripedia

भारतात भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते आणि मागणी पण खुपच जास्त असते. अशाच भाजीपाला पिकांपैकी एक महत्वाचे पिक म्हणजे फ्लॉवर (Cauliflower). जे शेतकरी आगात फ्लॉवर लागवड (Earlie Cauliflower Farmimg) करतात त्यांच्यासाठी आज आपण काही खास टिप्स जाणुन घेणार आहोत.

Updated on 23 September, 2021 9:37 PM IST

भारतात भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते आणि मागणी पण खुपच जास्त असते. अशाच भाजीपाला पिकांपैकी एक महत्वाचे पिक म्हणजे फ्लॉवर (Cauliflower). जे शेतकरी आगात फ्लॉवर लागवड (Earlie Cauliflower Farmimg) करतात त्यांच्यासाठी आज आपण काही खास टिप्स जाणुन घेणार आहोत.

 

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) आगात फ्लॉवर लागवड (Cauliflower Farming)करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. जर शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घेतली तर त्यांना उत्तम उत्पादन मिळेल आणि ते जास्तीत जास्त नफा मिळवू शकतील. आगात फ्लॉवर विकसित होण्याची किंवा काढणीची ही वेळ आहे. अशा परिस्थितीत योग्य पाण्याची व्यवस्था, खत व्यवस्थापन, तण आणि कीड नियंत्रण ह्या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष घालणे आवश्यक आहे.

कृषी शास्त्रज्ञ (Agricultural Scientist) फ्लॉवर पिकाविषयी सल्ला देताना सांगतात की, पिकाला 5 ते 7 दिवसांच्या अंतराने मध्यम पाणी द्या. तण नियंत्रणासाठी (WeedControl), पीक 35 ते 40 दिवसांचे असताना निंदनी किंवा खुरपणी करून शेत तनमुक्त करा. यामुळे पिकाची वाढ चांगली होईल आणि उत्पादन वाढेल याची खात्री आहे.

 फ्लॉवरला रोगाच्या आक्रमनापासून वाचवण्यासाठी घ्या ही काळजी

पाण्याचे व्यवस्थापन, खुरपणी, निंदनी केल्यानंतर, फ्लॉवर पिकाला (Cauliflower Crop)खत देणे हा पिकवाढीसाठीचा खूप महत्वाचा भाग आहे.  शेतकरी बांधवांनी आगात लावलेल्या फ्लॉवरमध्ये खत वापरलेले असेलच, परंतु राहिलेली खताची मात्रा ह्या वेळी पिकाला लावुन द्या.

 फ्लॉवर पिकासाठी प्रति हेक्टर दराने 60 किलो नत्र शेतात टाकावे. नत्र म्हणजेच नायट्रोजन पिकाच्या वाढीसाठी खुप आवश्यक असते. तुमच्या जमिनीवरून, तुमच्या प्रदेशातील हवामानानुसार ह्या प्रमाणात कमी जास्त होऊ शकते. ह्यासाठी कृषी विशेषज्ञचा सल्ला घ्या, हे मार्गदर्शन पण तुमच्यासाठी उपयोगाच ठरेलं.

 फ्लॉवरवर रोग आणि किडिंच्या आक्रमणाबद्दल जर बघितले तर, आगात लावलेल्या फ्लॉवरमध्ये दोन प्रकारचे रोग येण्याची शक्यता जास्त असते. पानावर आक्रमन करणारा काळा डाग रोग,

ज्याला पानांचा भुरी डाग रोग देखील म्हणतात आणि दुसरा आहे काळा रॉट.  हे टाळण्यासाठी मॅन्कोझेब किंवा इंडोफिल एम -45 ची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात असे प्रमाण घेऊन पिकावर फवारणी करावी.  जर रोग नियंत्रणात नाही आला तर , 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करा.

English Summary: on time cultivation of cabbage care approprietly
Published on: 23 September 2021, 09:37 IST