Agripedia

मित्रांनो मध्यंतरी जमिनीवर तणनाशक म्हणून मिठ फवारणी करा. अशी मध्यंतरी महिती सोशल मीडिया वर फिरत आहे

Updated on 31 January, 2022 11:39 AM IST

मित्रांनो मध्यंतरी जमिनीवर तणनाशक म्हणून मिठ फवारणी करा. अशी मध्यंतरी महिती सोशल मीडिया वर फिरत आहे.मी तज्ञांशी केलेल्या दिर्घ चर्चेतून खालील निष्कर्ष काढला आहे.   

 मिठच नाही तर कोणतेही रसायन त्याच्या मुळ स्वरुपात कार्य करीत नाही ते कार्यरत होत असताना त्याचे विघटन होते मिठाच्या विघटनानंतर तयार होणारी आयन्स Na+ cl- हे जमिन किंवा पिकांसाठी खुप हानिकारक होतात मित्रांनो जमिनिमध्ये उपलब्ध असलेले सोडीयम क्लोराईड,मॅग्नेशियम,

आणि कॅल्शियम सल्फेट, या सारख्या क्षारामुळे वनस्पती /पिकावर खुप वाईट परिणाम होतो याला मिठाचा स्ट्रेस सुध्दा म्हणता येईल मिठ वापरल्यावर होणारे परिणाम जमिन क्षारपड होते( 2) जमिनीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता कमी होते 

क्षारयुक्त पाण्यामुळे वनस्पती लहान व खुरट्या राहातात पाने व फळाच्या पेशीसमुहाचा काही भाग नष्ट होऊन आकार बदलतो

 मिठाचा वापर किंवा क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास

जमिनित पाणी असुन सुद्धा ते झाडांना शोषता येत नाही परिणाम झाड वाळतात सोडीयम चे प्रमाण जास्त असेलतर नत्र,पालाश,कॅल्शियम ही अन्नद्रव्य शोषता येत नाहीत 

मिठामुळे हरितद्रव्याला हानी पोहचते त्यामुळे अन्न बनवायची प्रक्रिया अडथळा तयार होतो म्हणून म्हणतो मित्रांनो मिठ शेतीसाठी योग्य नाही व काही शेतकरी बांधव तर व्हीडीओ पाहिला तर त्यात 15लि पंपाला 2किलो खडे मिठ वापरतात मित्रांनो मी सरळ सांगेन की थोडा विचार करा जेवण करताना थोडे मिठ जास्त झाले तर आपण जेवण बंद करतो

आणि तुम्ही तर पंधरा लि पंपाला दोन किलो मिठ म्हणजे तुम्ही स्वत: आपली शेती क्षारपड / नापिक करायला चाललोय.  

तेव्हा शेतकरी बांधवांनी जमिनीवर फवारणी साठी मिठाचा अजिबात वापरू नका .

English Summary: On soil salt spraying correct or incorrect
Published on: 31 January 2022, 11:39 IST