Agripedia

भारतात भाजीपाला पिकांची मागणी ही वर्षभर कायम बनलेली असते, आणि हेच कारण आहे की अल्प भूधारक शेतकरी भाजीपाला पिकांच्या लागवडिकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना आपल्याला दिसत आहेत. भेंडी देखील भाजीपाला पिकांत आपले महत्वाचे स्थान ठेवते, अनेक शेतकरी भेंडी लागवडीतून हजारोची कमाई करत आहेत.विशेष करून महाराष्ट्रातील शेतकरी भेंडीच्या लागवडीतून चांगली कमाई करू शकतात.

Updated on 15 September, 2021 1:16 PM IST

भारतात भाजीपाला पिकांची मागणी ही वर्षभर कायम बनलेली असते, आणि हेच कारण आहे की अल्प भूधारक शेतकरी भाजीपाला पिकांच्या लागवडिकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना आपल्याला दिसत आहेत. भेंडी देखील भाजीपाला पिकांत आपले महत्वाचे स्थान ठेवते, अनेक शेतकरी भेंडी लागवडीतून हजारोची कमाई करत आहेत.विशेष करून महाराष्ट्रातील शेतकरी भेंडीच्या लागवडीतून चांगली कमाई करू शकतात.

.पण यासाठी शेतकऱ्यांनी वैज्ञानिक पद्धतीने भेंडी लागवड करणे खुप गरजेचे आहे. जे पण नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर सुयोग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून भेंडीची गुणवत्ता चांगली राहील आणि शेतकऱ्यांना त्याच्या मालांचा योग्य मोबदला मिळेल. शेतकरी बांधवानो ह्या लेखात जाणुन घ्या भेंडीच्या शेतीविषयी.

आपले महाराष्ट्रातील शेतकरीही मोठ्या संख्येने भेंडीची लागवड करतात. भेंडीचे पीक असे आहे की त्याची कच्ची फळे(भेंडी ) तोडली जातात. जे आपण भाजी म्हणून खातो. भारतात जवळपास सर्वत्र भेंडी ही खाल्ली जाते. भेंडी ही उपवासात देखील खाल्ली जाते. ही एक स्वादिष्ट भाजी आहे जी खूप पौष्टिक देखील आहे, परंतु जेव्हा आपण त्याच्या लागवडीबद्दल विचार करतो, तेव्हा आपण त्याच्या काही वैज्ञानिक पैलूंकडे देखील लक्ष दिले पाहिजे.

जाणुन घ्या भेंडी लागवडीची वैज्ञानिक पद्धत

जमिनीची निवड: शेतकरी वर्षातून दोनदा भेंडीची लागवड करू शकतात. उन्हाळ्यात एकदा आणि पावसाळ्यात एकदा भेंडीची लागवड केली जाते. जर तुम्ही पावसाळ्यात त्याची लागवड करत असाल तर शेतकरी बांधवांनी लक्ष द्यावे की भेंडीच्या शेतात कोणत्याही परिस्थितीत पाणी साचू देऊ नये.  म्हणून, त्याच्या लागवडीसाठी अशी जमीन निवडा जिथे पाणी साचणार नाही. म्हणुन जमीन निवडतांना उंचीवरची जमीनची निवड करावी. त्याची लागवड रेताड चिकणमाती किंवा फक्त चिकण माती असलेल्या जमिनीत करावी. भेंडी लागवड करताना काळजि घ्या की जमीन सुपीक असायला पाहिजे. अशी जमीन निवडण्याचा प्रयत्न करा जिथे कार्बनचे प्रमाण खूप जास्त आहे. यासह, शेत तयार करताना, पाण्याचा निचरा करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या नाल्यांची व्यवस्था करा.

भेंडी लागवडीसाठी कशे तयार करणार वावर

भेंडी पीक हे असे पीक आहे की ज्याची मुळे खोलवर जातात, म्हणून जेव्हा तुम्ही शेत नांगरत असाल, तेव्हा पहिली नांगरणी चांगली खोलवर करा. नंतर दुसरी नागरणी साधारण केली तरी काही हरकत नाही, आणि मग फळी मारून वावर सारखे केले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मातीत क्षार आढळतात म्हणजेच बहुतेक माती अम्लीय आहे. त्यामुळे शेत तयार करताना जेथे माती आमलीय असेल त्या शेतात एक किंवा दीड किलो चुना मारून घ्यावा, पण त्याआधी माती परीक्षण अवश्य करा. हे सर्व काम बियाणे लावण्यापूर्वी एक पंधरवडा आधी करा. यानंतर, शेवटी लागवडीच्या वेळी 80 ते 100 किलो शेणखत प्रति एकर या प्रमाणात जमिनीत टाका.  याशिवाय 40 ते 50 किलो डायमोनियम फॉस्फेट आणि युरिया आणि पोटॅश समान प्रमाणात वावरात टाका. यासाठी कृषी वैग्यानिकाचा सल्ला मोलाचा ठरेलं.

 

बियाण्याची निवड ठरेलं महत्वपूर्ण

कोणत्याही पिकाच्या लागवडीमध्ये बियाणे निवडणे अत्यंत महत्वाचे कार्य आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा सुधारित वाणांचे बियाणे वापरावे जेणेकरून उत्पादन चांगले मिळेल आणि त्यांना परिणामी चांगला नफा मिळेल. यासाठी, नवी दिल्ली येथे तयार केलेली वाण पुसा ए 4 व्यतिरिक्त, देशातील इतर संस्थानी तयार केलेली भेंडीच्या बियाण्यांची सुधारित वाण निवडावी म्हणजेच शेतकऱ्यांना विश्वासाचे बियाणे मिळेल आणि उत्पादन चांगले मिळेल. याशिवाय, बियाणे पेरण्यापूर्वी ट्रायकोडर्माचा वापर करून बीजप्रक्रिया करा.  6-8 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियान्याला वापरा.

English Summary: okhra cultivation process and technology
Published on: 15 September 2021, 01:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)