सध्या आंबे बहारातील डाळिंब फळांवर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरवात झालेली आहे. यासाठी घाबरून न जाता 10 - 10 दिवसांचे टप्पे पाडून त्याचे व्यवस्थित वेळापत्रक बनवून त्यानुसार कामे करावीत.तलकट रोगाचे नियोजन करताना सर्वप्रथम एक गोष्ट अमलात आणणे फार गरजेचे असते ते म्हणजे तेलकट रोगासाठी जास्तीच्या फवारण्या टाळाव्यात.तेलकट रोगासाठी विचारपूर्वक फवारणी करावी, अन त्यासाठी वेळापत्रक बनवून त्याचे योग्य नियोजन करावे,तेलकट रोगाचे नियोजन करण्यासाठी आपण वेळापत्रक कसे असावे याचे उदाहरण पाहू.- सर्वप्रथम हायड्रोजन पेरोक्साइड (नॅनो सिल्वर) – २ मिली प्रती लिटर पाणी (मायक्रोशिल्ड – राकोल्टो अॅग्रीटेक इंडिया प्रा. लि.)
तेलकट रोगास अनुकूल वातावरण झाल्यानंतर संध्याकाळी करावी. जर पूर्ण ढगाळ वातावरण असेल सूर्यप्रकाश नसेल तर दिवसासुद्धा फवारणी करू शकता. मायक्रोशिल्ड फवारणीमध्ये पाणी व्यतिरिक्त दुसरे कोणतेही औषध मिसळू नये. ही फवारणी झाल्यानंतर, एक दिवस सोडून तिसऱ्या दिवशी खाली दिलेल्या पिकाच्या अवस्थेनुसार खालील फवारणी करावी.फळांची अवस्था - तिसर्या दिवशी सकाळी खालील प्रमाणे फवारणी करावी. खालील फवारणीमध्ये नॉन आयोनिक स्टीकरचा वापर करावा.- कॉपर ओक्सीक्लोराईड (ब्लू कॉपर - क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन)२ ग्रॅम + २ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन, १,३ डायल (बॅक्ट्रेसेल – युनिवर्सल बायो-कोन प्रा. लि.) – ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणीकिंवा - कॉपर ओक्सीक्लोराईड (ब्लू कॉपर - क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन) २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन (स्ट्रेप्टोसायक्लीन – हिंदुस्तान अॅंटीबायोटिक्स लि.) - 0.25 ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा - कॉपर
हायड्रोक्साइड (कोसाईड - कोर्टेवा) २ ग्रॅम + २ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन, १,३ डायल (बॅक्ट्रेसेल – युनिवर्सल बायो-कोन प्रा. लि.) – ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणीकिंवा - कॉपर हायड्रोक्साइड (कोसाईड - कोर्टेवा) २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन (स्ट्रेप्टोसायक्लीन – हिंदुस्तान अॅंटीबायोटिक्स लि.) - 0.25 ग्रॅम प्रती लिटर पाणीवरीलपैकी कोणतीही एक फवारणी घ्यावी.फुलांची अवस्था किंवा फळांना लाल रंग आलेली पक्वता अवस्था - तिसर्या दिवशी सकाळी खालील प्रमाणे फवारणी करावी. खालील फवारणीमध्ये नॉन आयोनिक स्टीकर चा वापर करावा.- कॅप्टन ५०% (कॅपटाफ - टाटा रॅलीस) - २.५ ग्रॅम + २ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन, १,३ डायल (बॅक्ट्रेसेल – युनिवर्सल बायो-कोन प्रा. लि.) – ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणीकिंवा - कॅप्टन ५०% (कॅपटाफ - टाटा रॅलीस) - २.५ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन (स्ट्रेप्टोसायक्लीन – हिंदुस्तान अॅंटीबायोटिक्स लि.) - 0.25 ग्रॅम प्रती लिटर पाणी
वरील फवारणी केल्यानंतर जर पुढील 6 दिवसाच्या आत पाऊस आल्यास पावसानंतर दुसऱ्या दिवशी किंवा पाऊस न आल्यास 6 व्या दिवशी सायंकाळी खालील फवारणी करून घ्यावी.- डिसनिल सॉइल (हंटीन ऑरगॅनिक्स) – 0.5 मिली प्रती लिटर पाणी + गूळ - 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी (हे द्रावण सकाळी पाण्यात भिजत ठेवावे व सायंकाळी फवारणी करावी. किंवा सायंकाळी स्पोरप्लस (एसके बायोबीज) - 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जर सतत पाऊस असेल, जमीन भारी असेल आणि ढगाळ वातावरण असेल, फळ धारणा झालेली असेल व पुन्हा वातावरण जर तेलकट रोगास अनुकूल झाले तर कॉपर डस्टिंग चा पर्याय देखील वापरू शकता.- कॉपर डस्ट 4% (कॉपसील - वेदांत अॅग्रो) - 4 किलो प्रती एकर डस्टिंग करावी.
Published on: 09 July 2022, 08:01 IST