Agripedia

रोपे तयार करणे : • रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याच प्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. • तीन मीटर लांब,एक मीटर रुंद आणि 15 से.मी.उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.

Updated on 08 February, 2022 1:59 PM IST

 रोपे तयार करणे :

  • रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याच प्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी.
  • तीन मीटर लांब,एक मीटर रुंद आणि 15 से.मी.उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.

वाफ्यावर दोन से.मी.खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात. त्यात प्रथम फोरेट (10 जी ) हे कीटकनाशक दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बी पेरणी करावी.

  • प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्‍टर ढोबळी मिरची लागवडीसाठी सुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाणाची गरज असते.जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.
  • रोपे सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर ती पुनर लागवडीस तयार होतात. लागवड करताना रोपे 15 सें. मी. उंचीची आणि आठ ते दहा पाने असलेली निरोगी, सशक्त असावीत.

प्रो ट्रे पद्धत :

  • कंपोस्ट आणि बारीक रेती ( वाळू ) हे 1:1 या प्रमाणात मिश्रण करून ट्रेमध्ये भरावेत. सर्वसाधारणपणेएका ट्रे मध्ये 3 ते 4 ग्रॅम मिरची बी लागते.ट्रेमधील माती भिजवून त्यावर कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची फवारणी करावी. ओळी तयार करून अर्ध्या इंचावर बियाणे टोकून. त्यावर झाकून घ्यावे. ट्रे वर प्लास्टिक कागद झाकल्यास उब मिळून 4 ते 5 दिवसात बियाणे उगवते.
  • त्यानंतर प्लॅस्टिक कागद काढून ट्रे उन्हात ठेवावेत आणि ट्रे ओलसर राहतील,याची काळजी घ्यावी.- दहा ते पंधरा दिवसांनी ट्रेमधील रोपे प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून ठेवावेत तीन ते चार आठवड्यांनंतर ही रोपे लागवडीसाठी वापरावीत.

लागवड:

 रोपांची लागवड करताना दोन ओळीतील अंतर 60 सें. मी. ठेवल्यास एकरीस सर्वसाधारणपणे 14,520 झाडे लागतात रोपांची लागवड संध्याकाळी करावी. हलकी जमीन असेल,तर सरीमध्ये लागवडकरावी. आणि भारी जमीन असेल,तर सरीच्या एका बगलेस करावी.

English Summary: nursury management of dhobli chilli and process of recultivation
Published on: 08 February 2022, 01:59 IST