Agripedia

कांद्याचे लागवड आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कांदा लागवडीमध्ये नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. कांदा लागवडी मध्ये सकस आणि निरोगी रोपांची निर्मिती भविष्यातील कांदा उत्पादन जास्त येण्याची गुरुकिल्ली आहे

Updated on 13 February, 2022 6:49 PM IST

कांद्याचे लागवड आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कांदा लागवडीमध्ये नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. कांदा लागवडी मध्ये सकस आणि निरोगी रोपांची निर्मिती भविष्यातील कांदा उत्पादन जास्त येण्याची गुरुकिल्ली आहे

त्यामुळे कांद्याच्या रोपवाटिकेची व्यवस्थापन योग्य रीतीने करणे फार महत्त्वाचे असते. यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात पण  त्याकसोशीने पाळणे फार महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण कांदा रोपवाटिकेचे व्यवस्थापन बद्दल माहिती घेऊ.

 कांद्याची रोपवाटिका :-

  1. एक हेक्‍टर कांदा लागवडीसाठी 10 ते 12 गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते.
  2. रोपवाटिकेसाठी जागा विहिरीजवळ असावी. म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होते.
  3. लव्हाळा,हरळी असणारी तसेच पाणी साचणारी सकल जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये.
  4. रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी जागी करावी. तणाची वाढ होण्याची शक्यता असल्यास किंवा शेन  खतांमधून तन येण्याची शक्यता असल्यास बियाणे पेरण्यापूर्वी वाफे भिजवून घ्यावेत.तणाचे बी उगवून आल्यानंतर खुरपणी करून बियाणे पेरावे.
  1. रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. गादीवाफ्यावर रोपांची एकसारखी वाढ होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजत नाहीत. लागवडीच्या वेळी रोपे सहज उपटून काढतायेतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
  2. गादी वाफे एक मीटर रुंद, तीन ते चार मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची 15 सेमी ठेवावे.गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत.
  3. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि 50 ग्रॅम मिश्र खत मिसळावे,तसेच अर्धा ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति वर्ग मीटर या प्रमाणात वाक्यात चांगल्या कुजलेल्या शेणखताबरोबरीने मिसळावे.खते आणि वाफ्यातील माती मिसळून त्यावरील दगड किंवा बारीक ढेकळे वेचून  घ्यावित. वाफा सपाट करावा.
  4. रूंदीशी समांतर चार बोटे अंतरावररेघा पाडाव्यात. त्यात बियाणे पातळ पेरून मातीने झाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे.पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे.
  5. बियांची उगवण क्षमता चांगली असेल तर एक हेक्‍टर लागवडीसाठी सात किलो बियाणे पुरेसे होते.साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर 10 ग्रॅम बी पेरावे. म्हणजे एका वाफ्यावर 30 ग्रॅम बी पेरावे.
  1. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2.5 ते तीन ग्रॅम  थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमचीप्रक्रिया करावी.
  2. बी पेरल्यानंतर पहिले पाणी शक्‍यतो झारीने द्यावे. म्हणजे बियाणे जागच्या जागी राहते; परंतु वाक्याचे प्रमाण एकूणच जास्त असल्याने झारीने पाणी देणे शक्य होत नाही अशावेळी पाटाने पाणी देणे सोयीचे ठरते मात्, पाणी देताना त्याचा प्रवाह कमी ठेवावा.., तसेच वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवावी म्हणजे पाण्याचा जोर कमी होईल आणि बियाणे पाण्याबरोबर वाफ्याच्या कडेला वाहून जाणार नाही.
  3. बी पेरल्यानंतर जमिनीचा वरचा थर सात ते आठ दिवसांपर्यंत ओला असणे आवश्यक आहे.त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते.त्यानंतर पाणी बेताने  सात ते आठ दिवसाच्या अंतराने द्यावे.
  1. तन असल्यास खुरपणी करावी रोपांच्या ओळीमध्ये माती हलवून घ्यावी म्हणजे रोपांच्या मुळांभोवती  हवा खेळती राहील. पुनर्लागवडीच्या आधी पाणी कमी करावे. त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी 24 तास अगोदर पाणी द्यावे त्यामुळे रोप काढणे सोपे होते.
  2. खरीप हंगामात 40 ते 50 दिवसात तर रब्बी हंगामात 50 ते 55 दिवसांत रोपे तयार होते.

 रोप तयार होत असताना त्यावर फुलकिडे व शेंडा जळणे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यांच्या नियंत्रणासाठीऑक्सिडीमेटॉनमिथाईल 15 मि.ली. आणि 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.या द्रावणात सर्फेक्टन्ट मिसळावा.

English Summary: nursury management is important for onion more production
Published on: 13 February 2022, 06:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)