Agripedia

पपई फळात ‘अ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम,

Updated on 05 June, 2022 7:27 PM IST

रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम, व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता,अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी फ्रुटी, पपई प्युरी पपई पावडर, बेबी फूड्स ई प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात.क्षेत्र व उत्पादन- भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, व पश्चिम बंगाल ई. राज्यात मोठ्या प्रमाणत उत्पादन होते महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नासिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई घेतली जाते कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई या पिकातून मिळते

हवामान - कडाक्याची थंडी, जोरात येणारे वारे आणि धुके या पिकाला हानिकारक ठरते उष्ण कटीबंधात हे पिक जोमाने वाढते तथापि समशीतोष्ण हवामानातही उत्पादन चांगले होते पपई पिकास सरासरी तापमान २५ ते ३८ अंश से आणि वार्षिक पर्जन्यमान १५०० मि.मी. मानवते पपईची झाडे जास्तीत जास्त ४४ अंश से तर कमीत कमी १० अंश से तापमान सहन करू शकतात जमीन- उत्तम निचर्याची मध्यम काळी किवा तांबडी व हवा राहणारी जमीन योग्य ठरते. जांभ्या खडकात पपईची झाडे उत्तम वाढतात. खडकाळ जमिनीत हे झाड चांगले वाढत नाही. जमिनीचा सामू ६.५ ते ८.० योग्य असतो जाती- पपई सिलेक्शन क्र. १,२,३ व ५, को-५, को- ६, पुसा ड्वार्फ, पुसा नर्हा, पुसा जायंट, कुर्ग हनी, को-७, पुसा डेलीशीस, सनराइस सोलो या जाती आहेत.पेपेनसाठी को -६ , व पुसा मेजेस्टी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.

रोपे तयार करणे - एक हेक्टर लागवडीसाठी २५० ते ३०० गरम बियाणे पुरेसे आहे. रोपे तयार करण्याच्या आधी २० ते ३० ग्रॅम "सुदर्शन" प्रती किलो बियाण्यास लावावे हि रोपे साधारण ६ते ७ आठवडे झाल्यानंतर आणि उंची १५ ते २२ स. मी. झाल्यानंतर करावी पूर्वमशागत व लागवड - लागवडीपूर्वी जमिनीची आडवी, उभी नांगरणी करावी शेणखत हेक्टरी २० ते २५ टन (४० ते ५० बैलगाड्या) पसरवून मातीत मिसळून घ्यावे व जमीन सपाट करावी लागवडीतील अंतर २.२५ मी X १.५ मी. लागवड करण्याने २००० झाडे बसतात. १.५ बाय १.५ मी या पद्धतीत ४४४४ झाडे लावली जातात. यासाठी पुसा नन्हा या बुटक्या जातीची निवड करावी शेताची आखणी केल्यानंतर ४५X ४५X ४५ से. मि. आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत मल्चिंग- बाग तणविरहित ठेवण्यासाठी मल्चिंग फायद्याचे ठरते त्यामुळे पाण्याचीही बचत होते पॉलिथीनचा काळ्या रंगाचा मल्चींग पेपर (४० ते ५० मायक्रोन जाडीचा ) पपईच्या दोन झाडाच्या ओळीमध्ये अथरून त्याच्या कडा मातीत बुजून टाकव्यात

लागवड - जून- जुलै, सप्टेबर- ऑक्टोबर आणि जाने -फेब्रु या महिन्यात करतात पपईची रोपे लागवडीसाठी ५० ते ६० दिवसात तयार होतात लागवडीनंतर फळे ११ ते १२ महिन्यात काढणीस तयार होतात खत व व्यवस्थापन- खत प्रत्येकवेळी हप्त्यात (ग्राम प्रतिझाड) अमोनियम सल्फेट किवा युरिया २५० किवा १०० सिंगल सुपर फॉस्फेट ३०० सल्फेट ऑफ पोटाश ८२ तसेच जास्त उत्पादन मिळवण्यासाठी "सम्राट प्लस/सुपर पॉवर/स्फूर्ती ४५/प्रिन्स" च्याा फवारण्या कराव्या.पाणी व्यवस्थापन -पपईत ठिबक सिंचनाची सोय सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे ठिबक असल्यास उत्पादनात वाढ होते.आंतरपिके - पपईच्या बागेत मुग, उडीद , चवली, वाटाणा, श्रावण घेवडा, सोयाबीन, भुईमुग अशी पिके घ्यावीत.काढणी व उत्पादन- पपईच्या प्रतीझाडापासून ४० ते ८० फळे मिळतात. उत्पादन हेक्टरी ५० ते ८० मे. टनापर्यंत मिळते.

English Summary: Now you should know this technology of papaya cultivation
Published on: 05 June 2022, 07:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)