निसर्गाच्या लहरीप्रमाणे कांद्याचे (onion) दर कमी जास्त होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आत्ता सध्या कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचा खर्च ही निघत नाही. उन्हाळी हंगामातील (summer season) कांद्याची आवक सुरु झाली होती. मात्र, आता भाव मिळत नाही. यावर एक उपाय आहे.
कांदा दारावर रामबाण उपाय
वातावरणातील बदलाचा सर्वात आगोदर परिणाम हा कांदा पिकावर होतो. गेल्या महिन्यात कांदा ३५ रुपये किलो दराने विकला जात होता. तोच कांदा ९ रुपये किलो दराने विकला जात आहे. यावर आता एक उपाय आहे. शेतकऱ्यांनी आता विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला पाहिजे. कांदा चाळीचा (Onion Chali) आधार घेऊन शेतकरी कांद्याची साठवणूक करू शकतात. चाळीत 8 ते 9 महिने कांदा साठवता येतो.
महत्त्वाच्या बातम्या :
Gudi Padwa 2022: गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट
Wheat Allergy: गव्हाची चपाती खाल्ल्याने 'या' लोकांना होते अॅलर्जी, हळूहळू ही लक्षणे जीव घेतील!
भविष्यात होणार फायदा
सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे संरक्षण आणि भविष्यातील योग्य दर मिळावा या अनुशंगाने कांद्याची साठवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा भविष्यात फायदा होणार आहे.
कांदाचाळीत अशी घ्या काळजी
१. कांदा चाळीतील कांदा सडू नये म्हणून एकाच ठिकणी अधिकच्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करु नका.
२. शिवाय साठवणूक करण्यापूर्वी कांदा हा तीन ते चार वेळेस कडक ऊन्हामध्ये वाळवणे आवश्यक आहे.
३. कांदा वाळवल्यानंतर लागलीच तो गोण्यामध्ये भरुन ठेऊ नये किंवा ढीग घालून एकत्र ठेऊ नये.
४. कांदा चाळीत ठेवलेल्या कांद्याची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे. जेणेकरुन इतर कांदे सडणार नाहीत.
Published on: 01 April 2022, 02:13 IST