पहिला मावा हा मोहरी, बडीशेप, करडई या पिकांवर येतो. त्यावरून ओळखायचे, आपल्या पिकात तो येणार.शेपूचा शेंडा पांढरा पडला तर बुरशी येण्याचे संकेत.मेथीवर पांढरे डाग पडले तर बुरशी येण्याचे संकेत.मक्याची सिंगल लाइन करून त्याचे कंपाउंड केले व कांदा शेतातही लावल्यास थ्रिप्स कमी येतो. मक्याच्या पोंग्यात मित्रकीटक लवकर तयार होतात.
मक्यावर पांढरा व पिवळा मावा लवकर आकर्षित होतो.White and yellow mealybugs are quickly attracted to maize. तो कांद्यावर येत नाही.झेंडूची झाडे शेतात अधिक असली तर लाल कोळी आधी झेंडूला खातो.
शेतकरी बंधूनो, रिकामे डोके सैतानाचे घर असते
सूत्रकृमीलाही झेंडू अटकाव करतो.गोमूत्र व मीठ फवारणीने काळा मावा नियंत्रणात येतो.करडईच्या ज्या पानांवर मावा आला ती गोळा करायची, मोठ्या भांड्यात पाणी, रॉकेल घेऊन त्यात
पाने टाकायची. मावा मरतो.हिरवी मिरची व लसूण व गरजेएवढे थोडे मीठ यांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात द्रावण व काढा तयार करायचा. तोंडाला रुमाल बांधून फवारणी करायची, त्यामुळे अळीचे नियंत्रण होते.एका एकरात आठ तुळशी लावल्या तर त्याच्या वासाने शत्रुकीटक पिकाजवळ येत नाहीत. रणदिवे यांच्याकडे तुळशीची सुमारे दोनशे झाडे आहेत.
त्याच्या आजूबाजूला रोग-किडींचे प्रमाण नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.लिंबाच्या पाल्याची वा गवरीची जाळून राखुंडी तयार करून ती पिकावर धुरळल्यास नागअळी नियंत्रणात येते.रसशोषक किडींसाठी चिकट सापळे उपयुक्त ठरतात. फळमाशीसाठी गंध रसायन (ल्यूर) चिकट सापळ्याच्या ठिकाणी ठेवल्यास ती तेथे येऊन सापळ्याला चिकटते.
Published on: 06 November 2022, 03:29 IST