Agripedia

कापूस म्हंटल की डोळ्यासमोर येतो शुभ्र पांढरा रंग मात्र आता कापसाचं नाव घेताच आणखी एक रंग डोळ्यासमोर येईल तो म्हणजे खाकी रंग, खाकी रंगाचा कापूस.

Updated on 29 June, 2022 7:22 PM IST

कापूस म्हंटल की डोळ्यासमोर येतो शुभ्र पांढरा रंग मात्र आता कापसाचं नाव घेताच आणखी एक रंग डोळ्यासमोर येईल तो म्हणजे खाकी रंग, खाकी रंगाचा कापूस. अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खाकी रंगाच्या कापसाची नेमकी माहिती मिळते. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनी रंभापुर येथे वैदेही ९५ हा खाकी कापूस डोलतोय. विद्यापीठाच्या साडेबारा एकर प्रक्षेत्रावर वैदेही ९५ या नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या खाकी रंगाच्या कापूस वाणाची यावर्षी जूनच्या महिन्यात पेरणी केली सुमारे १६० दिवसाच्या या पिकावर किडींचा किंवा रोगाचा कोणताही प्रादुर्भाव या कालावधीत आला नसल्याचा तज्ज्ञानचा दावा आहे.

त्यामुळे हा कापूस पांढऱ्या कापसापेक्षा अधिक उत्तम असं म्हणावं लागेल. पहिल्यांदाच झालेल्या या प्रयोगातून सुमारे ३० ते ३५ क्विंटल कापूस अपेक्षित आहे._हा उत्पादित कापूस आय.सी.आर. सीडकॉट, मुंबई यांना पुरविण्यात येईल असे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कापूस शास्त्रज्ञ तारासिंग राठोड सांगतात. वैदेही ९५ या वाणाची लागवड आम्ही जून महिन्यात ५ हेक्टर क्षेत्रावर आम्ही केली आहे, केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बीजोत्पादन कापूस घेण्यात आला आहे. सुमारे सुमारे ३० ते ३५ क्विंटल कापूस अपेक्षित असल्याचे राठोड सांगतात.आता कापूस केवळ पांढरा राहिला नाही तर रंगीत कापूस उत्पादनाचे स्वप्न कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरविले आहेय 

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनी रंभापुर अकोला प्रक्षेत्रावर खाकी कापूस उत्पादनाचा हा पहिला प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी करून दाखविला आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बीजोत्पादन कापूस घेण्यात आला आहे. नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमधील संशोधक डॉ. विनिता गोतमारे यांनी हे बीज तयार केले आहे.रायमंडी आणि थरबेरी या रानटी कापसाच्या प्रजातीचे मिश्रण करून ही प्रजाती तयार करण्यात आल्याचे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे सांगतात यावर प्रक्रिया करून नैसर्गिकरित्या रंगीत कापड निर्मिती करता येऊ शकते, तसेच ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करता येईल मात्र हे सर्व राज्य सरकारवर अवलंबून आहे.

या कापसाचा गुणधर्म म्हणजे यापासून कोणतेही त्वचेचे आजार होत नाहीत.या खाकी आणि सेंद्रियकापूस वाणाची अकोल्यातील वनी रंभापुर प्रक्षेत्रावर पेरणी करून पहिल्या वेचातील उत्पादन काढले आहे.यातून निघणाऱ्या सरकीचे बियाणे करून पुढील वर्षी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच 100 एकरावर या सेंद्रीय आणि रंगीत कापूस वाणाचे उत्पादन घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.रंगीत कापसामध्ये विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. रंगीत कपाशीचे संशोधन आम्ही करत आहोत आणि त्यातून रंगीत कपाशीचे वाण येतील.या कापसाला मोठी मागणार असणार आहे.आंतराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ब्रँड तयार करण्याचा प्रयन्त आहे.खूप मोठा वाव असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी म्हटले.

English Summary: Now khaki cotton will be grown in the field. But learn how
Published on: 29 June 2022, 07:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)