Agripedia

कापूस या पिकावर डोमकडी व अळी दिसायला लागली आहे

Updated on 27 July, 2022 1:57 PM IST

कापूस या पिकावर डोमकडी व अळी दिसायला लागली आहे त्यासाठी आपण कीटकनाशकांची फवारणी करतरच आहोत,सेंद्रि अळी साठी अगोदरच काळजी घ्यावी, म्हणून प्रतिरोधक फवारणी केलेली बरी.अळ्यांची कोष हे जमिनीत , असतात आपण शेताची मेहनत केल्यामुळे ते वर येतात व रात्र आणि दिवसाचे कमाल व किमान तापमाना मुळे आकुंचन प्रसारण पावतात व फुटतात त्यातून पतंग बाहेर येतो, हा 2 महिने जीवन्त राहतो, व साधारणतः 2 आमवश्याना अंडी घालतो. त्या साठी आपल्या कापसाच्या पीकात एकरी 6 ते 8 कामगंध सापळे लावावेत.सध्या सगळीकडे अमेरिकन लष्करी अळी, सेंद्री अळीची घबराट पसरल्यामुळे ,शेतकऱ्यांनी फवारणी केल्यामुळे, सापळे लावल्यामुळे,पतंग पक्षांनी खाल्ल्यामुळे,आपण लावलेल्या सापळ्यात पतंग सापडनार नाहीत,किंवा अडकणार नाहीत, म्हणून जुलै च्या आमवेश्येला येणारा अळीचा अटॅक अगदी

सौम्य असेल , 1/2% सेंद्रि अळी असली तर सर्व पिकाला फवारणीची आवश्यकता नाही ,अळी असलेल्या पात्या आणि डोमकल्या शोधून तोडून फेकाव्यात, ज्याच्या कापसाला 25/30 फुलपाती लागलेली असेल त्यांनी आमवेश्येला स्टिकर ,निमार्क व अंडीनाशक कीटकनाशकांची फवारणी करावी ,जे शेतकरी फवारणी करतील त्यांच्या शेतात अळीचे प्रमाण कमी असेल .आमवेश्ये च्या 2 दिवस अगोदर व 4 दिवस नंतर अळी व अंडी नाशक फवारणी करावीच.सेंद्रीला अजिबात घाबरू नका ती नियंत्रणात येते पण फवारणीची वेळ महत्वाची असते, वेळेवर फवारणी केली तर 90 ते 95% या अळी वर नियंत्रण नियंत्रण मिळते.Timely spraying gives 90 to 95% control of this worm.ऑगस्ट आणि सप्टेंबरची आमव्यशा सांभाळा उत्पन्न चांगले येईल.बोगस कृषी सल्लागार,काही कंपन्यांचे प्रतिनिधी,अप्रामाणिक व्यावसायिक आणि कीटकनाशक कंपन्या खोटा प्रचार करून आपला कार्यभाग साधून घेतील.

मित्रानो त्यासाठी आपण अप प्रचाराला बळी पडू नका, 10 झाडात एकावर अळी सापडली म्हणून, काहीही फवारू नका,1 सेंद्रि अळी ही एकाच कैरीचे नुकसान करते ,आपल्या कापसाच्या हजारो पात्या अयोग्य नियोजन अभावी गळून पडतात म्हणून 1/2% अळी साठीची फवारणी न करता ती अळी आपल्या कापसावर पडू नये त्या साठी ,आता अळी साठी फवारणी न करता, तो खर्च कामगंध सापळ्यावर करा,कापसाच्या पिकात कामगंध सापळे लावा.मला जसा वेळ मिळतो तसे मी आपल्या सोबतच असेल, व मार्गदर्शन करत राहील ,फक्त योग्य तेच विचारा, उत्तर मिळेल, मला प्रश्न योग्य वाटला नाही तर मी उत्तर देत नाही, व तुमचा आणि माझाही वेळ वाया घालवत नाही.फेरोमन ट्रॅप ,चिकट पॅड प्रकाश सापळे यांचा वापर करा, इको पेस्ट लाईट ट्रॅप हवे असल्यास 9503537577 या नंबर वर संपर्क साधा.आजपासून दोन दिवसात हे सापळे कापूस पिकात लावा.अळी साठी फेरोमन ट्रॅप ,प्रकाश सापळा आणि रसंशोषण करणाऱ्या किडी साठी चिकट साफळ्यांचा

वापर केल्यास पतंग त्यात आकर्षित होतात. या सापळ्यांमध्ये नर आणि मादी दोन्हीही आकर्षित होत असल्याने किडींचे चांगले नियंत्रण मिळते. भाजीपाला तसेच अन्य पिकांवर मावा,तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी पिवळ्या किंवा निळ्या रंगाचे चिकट सापळे वापरता येतात.पिवळा रंग मावा, तुडतुडे तसेच पांढऱ्या माशीला आकर्षित करतो,तर निळ्या रंगाकडे फुलकिडी आकर्षित होतात. सापळ्यावर असलेल्या चिकट द्रव्यामुळे या किडी चिकटून मरतात. चिकट सापळे घरी बनवता येतात. अर्धा ते एक फूट आकाराचा पिवळा किंवा निळ्या रंगाचा जाड प्लॅस्टिक पेपर अथवा पुठ्ठा घ्यावा. त्याला दोन्ही बाजूने ग्रीस अथवा चिकट द्रव्य लावावे. असे सापळे पिकाच्या1 फूट उंचीवर दोरीने बांधून द्यावेत. एकरी 10 ते 15 सापळे लावावेत.दोन दिवसांनी अळी आणि आमवश्या यांचा संबंध या विषयीचा सविस्तर लेख पोस्ट करतो

 

श्री शिंदे सर

समूह संचालक, भगवती सिड्स चोपडा, जिल्हा जळगाव

9822308252

English Summary: Now apply odor traps in two days
Published on: 27 July 2022, 01:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)