आज शेती मोठ्या संकटात सापडली आहे.सुलतानी अस्मानी,कोरडा ,ओला दुष्काळ हे संकट सोडून आता शेतमजूरी हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.विशेष म्हणजे बेरोजगारी ने ओरडणारे शेतात कामाला चाल म्हंटल तर पाठ फिरवतात अन जे शेतात कामाला यायला येतात तो मजूर मात्र मालकाच्याच पदरी पीक येईल का नाय त्याचा विचार न करता उचलली जीभ लावली टाळुला या प्रमाणे डायरेक्ट अर्धा माल मागतो. एवढ्यावरच थांबत नाही तर मजुराला जाऊन उरलेला माल बाजारात बेभाव विकावा लागतो.अहो स्वतःहं रक्ताचा घाम गाळून पिकवलेल्या मालाला भाव ठवरण्याचा हक्क सुद्धा आपल्या पदरी नाही,व्यापारी दलाल शेतकऱ्यांची मजाक घेतात अन तो शेतकरी मात्र रक्ताचे अश्रू रडतो.साधं दुकानात गेलं 10 रुपयाचा नट बोल्ट 5 रुपयाला मागितला तर दुकानदार बोलतो पुढची दुकान पहा?
अन निघ? अन म्हणे कृषी प्रधान देश हा कुठला कायदा लिहावं तेवढ कमीच आहे अन वाचायला हि कुणाला वेळ आहे.शेतकरी व्यथा सांगायला लागलो तर समुद्राची शाई केली अन जमिनी इतका कागद केला तरी कदाचित कमीच पडेल.
आणखी ऐक गोष्ट लक्षात येत आहे प्रत्येक महिन्याला एक नवि कंपनी सेंद्रिय मधे आणि रासायनिक मधे जन्माला येत आहेत या लाॅकडाउन पासुन असे कळत आहे शेती चा पसारा मोठा आहे या इंडस्ट्रीत खुप पैसा आहे हे तत्व काही कंपन्यांनी ओळखले यात सगळे बंद होते लाॅखडाऊन मधे पण शेती इंडस्ट्रीत दिवसरात्र चालत होती शेतीला जोडी आरोग्य यंत्रणा वर आली जगात या दोन इंडस्ट्रीने आपले वर्चस्व सिद्ध केले पण यात शेती इंडस्ट्रीत फक्त कंपन्या वाले मोठे होताना दिसत होते यावरून हे नक्की सिद्ध होते
देशात काही दिवसांत पॅकींग भाजीपाला माॅल आणि औषधे कंपनी जागो जागी दिसतील पण शेतकरी आजपण फक्त पिकवण्याच्या चक्रात अडकला आहे आणि तसे अडकवले गेले आहे जसे शिक्षण घेण्यासाठी काॅलेज असते तसे विक्री व्यवस्था शिकवली जात नाही .किंबहुना फक्त पिकवणरा वारेवर सोडला जातो ह्या इंडस्ट्रीला कोणी बाहुबली नाही जो शेतकरी ना शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशिल आहे.
आज शेती मोठ्या संकटात सापडली आहे.सुलतानी अस्मानी,कोरडा ,ओला दुष्काळ हे संकट सोडून आता शेतमजूरी हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.विशेष म्हणजे बेरोजगारी ने ओरडणारे शेतात कामाला चाल म्हंटल तर पाठ फिरवतात अन जे शेतात कामाला यायला येतात तो मजूर मात्र मालकाच्याच पदरी पीक येईल का नाय त्याचा विचार न करता उचलली जीभ लावली टाळुला या प्रमाणे डायरेक्ट अर्धा माल मागतो.
एवढ्यावरच थांबत नाही तर मजुराला जाऊन उरलेला माल बाजारात बेभाव विकावा लागतो.अहो स्वतःहं रक्ताचा घाम गाळून पिकवलेल्या मालाला भाव ठवरण्याचा हक्क सुद्धा आपल्या पदरी नाही,व्यापारी दलाल शेतकऱ्यांची मजाक घेतात अन तो शेतकरी मात्र रक्ताचे अश्रू रडतो.साधं दुकानात गेलं 10 रुपयाचा नट बोल्ट 5 रुपयाला मागितला तर दुकानदार बोलतो पुढची दुकान पहा?? अन निघ? अन म्हणे कृषी प्रधान देश हा कुठला कायदा. लिहावं तेवढ कमीच आहे अन वाचायला हि कुणाला वेळ आहे.शेतकरी व्यथा सांगायला लागलो तर समुद्राची शाई केली अन जमिनी इतका कागद केला तरी कदाचित कमीच पडेल..
विपुल चौधरी मुपो परतवाडा
तालुका चादुर बाजार जिल्हा अमरावती
मो 9588462272
Published on: 27 January 2022, 05:26 IST