नमस्कार मंडळी आजचा लेख माझ्या के व्ही के घातखेड ला समर्पित आहे व आपन हा वाचाल! मला खात्री आहे मित्रांनो आपली माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय पदार्थ, हवा, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवाणू चे मिश्रण म्हणजे आपली मायमाती होय. जी वनस्पती तसेच जीवनसृष्टी साठी महत्वाचा दुवा ठरते. आज जाणून घेऊयात माती विषयी खास लेख सुपिक मातीची महत्वाचं कार्ये काय आहे?.
माती ची व्याख्या म्हणजे वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे.माती ही खताला कंपोस्ट करणारी यंत्रणा होय.माती वातावरणात बदल घडवून आणते.व सूक्ष्मजीवांचे वसतीस्थान आहे ति आपली जमीन मानवी आरोग्याची काळजी घेताना विविध बाबींचा ज्या गतीने विचार होतो, तेवढय़ाच गतीने जी जमीन आपल्याला उत्पादन देते तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विचार करायला हवा.
नवनवीन पद्धतीने उत्पादन घेताना होणाऱ्या खताचा वापर व जमिनीच्या पोताकडे होत चाललेले दुर्लक्ष यातून जमिनीची उपजत क्षमता दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे.
मित्रांनो आपन आपल्या
जमिनीतील सूक्ष्मजिवांचे प्रमान तपासले पाहिजेत व त्यानुसार कोणत्या पिकाला खताची किती मात्रा द्यावी याचे ज्ञान आपन मातीपरीक्षण या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केल्या गेले पाहिजे. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा पोत भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येकाच्या खताची मात्राही वेगळी असणार आहे ही बाब शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी शेतीशाळा आपनच हाती घेणे आवश्यक आहे.कारण प्रत्येक शेत शिवारातील मातीचा पोत भिन्न असतो. एखाद्या शेतकऱ्याकडे दहा ते पंधरा एकर जमीन असली तरी प्रत्येक पट्टीतील मातीचा पोत भिन्न असतो. एकदा माती परीक्षण करून भागत नाही. किमान दर दोन वर्षांनी मातीत होणारे बदल लक्षात घेऊन त्यानुसार खताचा वापर केला गेला पाहिजे.
हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.सर्व शेतकरी, शेतकरी बचत गट शेतकऱ्यांनी गावागावात सभा घेऊन शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व सांगून माती परीक्षणाकरिता प्रोत्साहित करावे व कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला पाहिजे. कारण सुरुवात स्वतापासुन करणं हे लक्षात घ्यावे.आपल्या शेतातल्या मातीचा सुपीक थर म्हणजे काय आणि तो कसा तयार झालेला आहे हे त्याला माहीत असेल तरच त्याला त्या थराची किंमत कळेल आणि त्याचा लहानसाही थर वाहून जाता कामा नये याची तो खबरदारी घेईल. सेंद्रिय पदार्थ मातीत पोषक आणि पाण्याचा साठा म्हणून काम करते, कॉम्पॅक्शन आणि पृष्ठभागावरील कवच कमी करण्यास मदत करते आणि मातीमध्ये पाण्याची घुसखोरी वाढवते. तरीही हे बर्याचदा दुर्लक्ष केले जाते. माती मधील सेंद्रिय पदार्थांच्या योगदानाची तपासणी करू आणि तो कसा टिकवायचा किंवा कसा वाढवायचा हे समजून घेणे आवश्यक आहे.
मित्रांनो माझ्या अनुभवावरूनमातीचा शेवटचा आणि महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तापमान. मातीचे तापमान खूप कमी असेल अशा वेळी बियाण्याची उगवण उशिरा होते आणि तापमान जास्त असेल तर काही वेळा बियाण्यांची उगवणसुद्धा होत नाही.
बियाण्याच्या उगवणीपासून पीक काढणीपर्यंत जमिनीचे तापमान योग्य असणे गरजेचे आहे. कारण वनस्पतींच्या वेगवेगळया जैविक क्रियांचा वेग हा या तापमानावर अवलंबून असतो.
मातीचे तापमान योग्य असेल तर जमिनीमध्ये असलेले उपलब्ध अन्नघटकांचे वहन पिकांच्या मुळांपर्यंत तसेच वनस्पतीच्या प्रत्येक भागात चांगल्या प्रकारे होऊन पीक उत्पादन चांगले होते.अनेक सुपीक जमिनी आवश्यक असून लोकांच्या आरोग्याचा पाया आहे, यात काही शंका नाही. मानवी विकास आणि प्रगतीची गुरूकिल्ली जमिनींचे आरोग्य आहे. माझे थोडक्यात सांगायचे झाले तर कृषी संबंधित विविध तंत्रांचा वापर करून शेतीशी निगडित संसाधन अधिक कार्यक्षमतेने उपयोग करता येऊ शकतो. ज्यामध्ये शेती उत्पन्न वाढवणे, खते तसेच शेती ला लागणारी किटकनाशक या वर खर्च कमी करणे, जमिनीचा कस वाढवणे इत्यादी कामे शक्य होईल. या तंत्रांचा अधिक वापर होऊ लागेल, शेतकर्यामधे चांगले वातावरण तयार होऊन शेतकऱ्यांसाठी अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध होऊ लागतील.
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
Published on: 20 January 2022, 12:58 IST