Agripedia

कांदा कापताना तुम्हाला रडू येतं का ? आता पण आता कांदा तुम्ही अगदी हसत कापू शकणार. हो , अगदी खरं तुम्ही जे वाचतात ते बरोबर आहे. कारण अमेरिकेतील सुनिऑन्स या कंपनीने गोड कांद्याची जात विकसीत केली आहे. कांद्यातील हवेत मिसळणारे काही घटक त्वरीत हवेत पसरतात. त्यामुळे सर्वसामान्य पणे आपल्या डोळ्यात पाणी येते.

Updated on 24 February, 2021 4:07 PM IST


कांदा कापताना तुम्हाला रडू येतं का ?  आता पण आता कांदा तुम्ही अगदी हसत कापू शकणार. हो , अगदी खरं तुम्ही जे वाचतात ते बरोबर आहे. कारण अमेरिकेतील सुनिऑन्स या कंपनीने गोड कांद्याची जात विकसीत केली आहे. कांद्यातील हवेत मिसळणारे काही घटक त्वरीत हवेत पसरतात. त्यामुळे सर्वसामान्य पणे  आपल्या डोळ्यात पाणी येते. कांद्यातील ही संयुगे जातीनुसार कमी -अधिक प्रमाणात असतात. साठवणीमध्ये कांद्यातील त्याचे प्रमाण वाढत जात असल्याचा अनुभव आहे. पण अमेरिकेच्या सुनिऑन्स कंपनीने तयार केलेला कांदा हा साठवणीमध्ये  अधिक गोड व न रडवणारा सौम्य होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिवाय कंपनीने यासाठी एक टॅगलाईन सुंदर दिली आहे, कांद्यावर खर्चू नका तुमचे अश्रू, तुमच्यासाठीच जपून ठेवादरम्यान या नव्या वाणाचे उत्पन्न कंपनीच्या नेवाडा आणि वॉशिंग्टन येथील परिसरातच कांद्याचे उत्पादन घेतले जात आहे.

हेही वाचा : कांदा दरवाढ: सरकारने घेतला मोठा निर्णय; साठवणूक मर्यादा ठरवली

काय आहे  या कांद्याचे वैशिष्ट्ये - कांदा चिरताना अजिबात अश्रू येत नाहीत. याच्या चाचण्या बायर सेन्सर लॅब  आणि ओहियो राज्य विद्यापीठातील प्रयोगशाळांमध्ये  घेण्यात आल्या आहेत. या कांद्याला विशिष्ट गोडी आहे,ती प्रत्येक कांद्यामध्ये सारख्याच प्रमाणात असल्याचा  दावा कंपनी करते.या कांद्याला एक कुरकुरीतपणा आहे,त्यामुळे खाद्य पदार्थांमध्ये शिजवून वापरण्यासोबतच कच्चा सॅलड म्हणूनही खाता येतो. या कांद्याची गोडी साठवणीमध्ये वाढत जाते.अन्य कांदे ज्यावेळी खराब होतात. विशेषत  त्यांच्या चवीमध्ये  तिखटपणा  वाढत जातो. कापतेवेळी  डोळ्यातून पाणी  काढतो.

English Summary: No need to cry while chopping onions; this is New variety of suions company
Published on: 26 October 2020, 05:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)