Agripedia

गहू हे रबी हंगामातील देशातील प्रमुख पीक आहे. गव्हाची लागवड ही भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते.आणि कृषी विद्यापीठांनी गव्हाच्या निरनिराळ्या वाण विकसित केले आहेत. गहू पिकाचा विचार केला तर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, बदलते हवामान इत्यादी घटकांचा परिणाम होऊन गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची समस्या निर्माण होते.

Updated on 15 November, 2021 8:45 PM IST

 गहू हे रबी हंगामातील देशातील प्रमुख पीक आहे. गव्हाची लागवड ही भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते.आणि कृषी विद्यापीठांनी गव्हाच्या निरनिराळ्या वाण विकसित केले आहेत. गहू पिकाचा विचार केला तर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, बदलते हवामान इत्यादी घटकांचा परिणाम होऊन गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची समस्या निर्माण होते.

 परंतु या सगळ्या समस्यांचा सातत्याने अभ्यास करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुंदेवाडी तालुका निफाड येथील संशोधन केंद्राने तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केला आहे. हा नवीन विकसित वान पास्ता, शेवया आणि कुरडयासाठी योग्य आहे. या गव्हाचे बियाणे शेतकऱ्यांना पुढील वर्षापासून मिळणार आहे.

 या कृषी संशोधन क्षेत्राच्या प्रक्षेत्रावर गहू सुधार प्रकल्पाच्या अनेक चाचण्या सुरू असतात. त्याच अनुषंगाने 24 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या बैठकीत एनआयडीडब्ल्यू -1149 या बन्सी प्रकारातील वाणाची भारतातील द्विपल्पिय विभागासाठी महाराष्ट्र व कर्नाटकात यासाठी नियंत्रित पाण्याखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

हा वाण शेवाया आणि कुरड्या  यांसाठी उपयुक्त असल्याचे तपासून याबाबतची घोषणा करण्यात आली.पुढच्या वर्षापासून कृषी संशोधन केंद्र निफाड यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादन घेऊन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 या वाणाची प्रमुख वैशिष्ट्य

  • हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.
  • या वानांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 11.50 टक्के इतके आहे.
  • हा वाण कुरडया, शेवया आणि पास्ता साठी उत्तम आहे.
  • याचा पक्का होण्याचा कालावधी हा 110 ते 115 दिवसाचाआहे.
  • या वाणाचे हेक्टरी उत्पादन क्षमताही 35 ते 40 क्विंटल आहे.(संदर्भ-ॲग्रोवन)
English Summary: new veriety og wheat is nidw 1149 is useful for makind paasta,noodels etc.
Published on: 15 November 2021, 08:45 IST