Agripedia

शेतीला सुपीक करण्याच्या आमिषा पोटी दर दोन तीन वर्षांनी एक नवा ट्रेंड येतो म्हणजे थोडं मागे गेला तर सल्फर , सिलिकॉन, सिलिका हे जमिनीला किती गरजेच आहे आणि याच सल्फर किंवा मग सिलिकॉन , सिलिका 1 लिटर च्या पॅकिंग मद्ये घेऊन अनेक कम्पन्या मार्केट मद्ये उतरल्या.

Updated on 03 December, 2021 8:53 PM IST

यांची सोपी स्ट्रॅटेजी होती अमुक तमुक प्रॉडक्ट्स वापरा ड्रीप वाटे आणि फवारणी वाटे पिकास द्या भरभरून उत्पन्न मिळवा, 

जमीन सुपीक बनवा जमिनीचा बिघडलेला पोत पुन्हा सुधरवा

अशा भ्रामक गोष्टी आपल्या माथी मारून या कम्पन्या करोडोंचा धंदा करतात त्यांचे मार्केटिंग (दुर्दैवाने शेतकरी च असतात)वाले हजारात लाखोंत कमाई करतात .

ठीक आहे कोटींची उड्डाणे घ्या हरकत नाही पण आज किती शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक झाल्या अशी उत्पादने वापरून.

किती जमिनींचा पोत सुधारला , किती शेतकऱ्यांना भरभरून उत्पादन मिळाले .

मग शेतकरी मित्रानो हा विचार आपण करायला हवा. धंदा करणारा त्याचा व्यावसायिक हेतू डोळ्यासमोर ठेवूनच आपल्यासमोर येतात .

दोष त्यांचा नाही आपण डोळेझाकून अशी उत्पादने विकत घेतो भूलथापांना बळी पडतो.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या एकर जमिनीत हजारो टण माती असते त्या जमीनीत अस एक लिटर दोन लिटर लिक्विड सोडून खरेच हजारो टण माती सुपीक होऊ शकते.

आज हा विषय घेण्याचे कारण म्हणजे सध्या  ऑरगॅनिक कार्बन

चा ट्रेंड आला आहे डोळे उघडे ठेवून आपला कष्टाचा पैसा कुठे खर्च करायचा या गोष्टीचा विचार करा.

ठीक आहे काही प्रमाणात फायदा होत असेल पण मागील सर्व प्रॉडक्ट्स चा विचार केला तर आपण जरा शहाणपण दाखवून काय वापरावे काय नको हे ठरवावे .

सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर आपल्या जमिनीतील ऑरगॅनिक कार्बन चे प्रमाण 0.5 टक्के असेल आणि ते आपल्याला 1 टक्के करायचे असेल तर हजारो टण शेणखत जमिनीत टाकावा लागेल किंवा तितकीच सेंद्रिय खते /रेडी कम्पोस्ट खते ज्यांच्यातील ऑरगॅनिक चे प्रमाण 18 ते 20 टक्के असते अशी.

त्यामुळे सजग होऊन शेती करा.

जमिनीला पुरेशी विश्रांती द्या , पिकबदल करा , हिरवळीचे खत जसे ताग धेंचा वापरा.

नक्कीच या गोष्टी शेतीला उपयोगी आहेत ,असतात आणि त्या जमणित उपायुक्त ही असतात .

तसेच पेस्टिसाईड कंपनीवाल्यांनी कुठे नेऊन ठेवलय आपल्याला.

१५ ते २० वर्षापूर्वी रेडोमिल एलिएट कर्झट बेलेटॉन या औषधांवर डाऊनी भूरी वर नियंत्रण मिळायचे आता का नाही.?

रोगाची ताकद वाढली का? 

औषधाची पॉवर कमी झाली का कंपनीन केली.?

असो काहीच कळत नाही कंपनी मोकार चरत आहे आणि शेतकरी कंगाल झाला आहे.

 

शरद केशवराव बोंडे.

 शेतकरी

९४०४०७५६२८

English Summary: New trends in agriculture.
Published on: 03 December 2021, 08:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)