जागतिक लोकसंख्या मध्ये वाढ होत आहे त्यासोबतच अन्नाची मागणी ही वाढत चालली आहे.आज शेतकरी अन्न उत्पादन वाढविण्यात भर देत आहे. हातावर शेतकऱ्यांना यामध्ये मदत करण्यासाठी सरकार नवीन नवीन योजना व तंत्रज्ञान याच निर्माण करत आहे. शेतकऱ्याच्या सर्वात मोठं आव्हान म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अन्नाचे उत्पादन करणे व यासाठी त्याला अनेक गोष्टींच्या सामोरे जावे लागते.अब्जांश तंत्रज्ञान म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान अण्णा उत्पादनाशी निगडित आव्हाने कमी करण्यास मदत करते.
गुणवत्तापूर्ण बियाणाचे विकसन, पिकांचे संवर्धन, विविध रोग व तृणवाढ यांपासून पिकांचे संरक्षण अशा अनेक बाबतीत अब्जांश तंत्रज्ञान उपयुक्त आहे तसेच कुक्कुट-पालन, गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांचे पालन इत्यादी पूरक व्यवसायांमध्ये देखील अब्जांश तंत्रज्ञान उपयुक्त आहे.
नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर :
• अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या अन्न पदार्थांना सर्वसाधारणपणे ‘अब्जांश अन्न’ असे म्हणतात. अन्नाचे पोषण ( Nutrients)मूल्य कमी होणार नाही याची दक्षता घेवून या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अन्नातील घटकांचा पोत व अन्नाची चव यामध्ये आवडीनुसार आवश्यक ते बदल करता येतात. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशवंत फळे, भाज्या व फुले यांचा टिकाऊपणा व ताजेपणा सुद्धा वाढवता येतो व अन्नाची वाहतुक करतेवेळी ही गोष्ट अत्यंत आवश्यक असते.
• सिंचनाच्या पाण्याचे शुद्धीकरण ( Drip/ Sprinkle Irrigation):
शेतकरी जवळ सिंचनाचे पाणी देतो त्या पाण्यात अनेक प्रकारचे रोगराई व जंतू असतात व तेच पाणी पिकांना दिल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते.यावर उपाय योजना म्हणून लागवडीचे मोठे क्षेत्र असणा-या शेतीमध्ये अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सिंचनाचे पाणी गाळून वापरण्याची पद्धत आता वापरली जात आहे. कार्बनी अब्जांश नलिका , सच्छिद्र अब्जांश सिरॅमिक (Nanoporous ceramic) व चुंबकीय अब्जांश पदार्थ यापासून बनवलेल्या पापुद्रिक गाळण्या (Membrane filters) यांचा वापर करून सिंचनाचे पाणी गाळले जाते. या प्रक्रियेमध्ये पाण्यांतील रोगजंतू मारले जातात. व यामुळे शेतकऱ्यांना चांगले पोषक पाणी सिंचनासाठी भेटते.
• कृषी अवजारांची झीज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
कृषी अवजार शेतात काम करून करून वेगवेगळ्या तत्वांचा संपर्कात येत असतात व त्यामुळे त्यांची दररोज झीज होण्याची क्षमता वाढत असते. अशा कृषी अवजारांना पृष्ठभागावर व बॉल बेअरिंगवर साठी अब्जांश कणांचा जैवसंवेदनशील पदार्थांचा लेप दिला जातो. व त्यामुळे अवजारांची झीज कमी होण्यासाठी सहाय्य मिळते.
अशा प्रकारे या नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये होत आहे व वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो.
ऋतुजा ल. निकम ( MBA AGRI)
Published on: 06 March 2022, 01:48 IST