Agripedia

शेती करताना एखाद्याच्या अपेक्षेनुसार कामाचे नियोजन करणे गरजेचे असते आणि त्याच्यावर संबंधीत अनेक घटक अवलंबून असतात. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे हा दृष्टिकोन शेतकऱ्याचा असतो.

Updated on 24 February, 2021 4:07 PM IST


शेती करताना एखाद्याच्या अपेक्षेनुसार कामाचे नियोजन करणे गरजेचे असते आणि त्याच्यावर संबंधीत अनेक घटक अवलंबून असतात. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे हा दृष्टिकोन शेतकऱ्याचा असतो. मात्र या प्रक्रियेत अनेकदा अपेक्षित आणि अनपेक्षित समस्या येतात. आपली कृषी परिसंस्था अर्थात अॅग्रो इकोसिस्टिम समजून घेण्याची गरज आहे. ती समजून घेतल्यावरच प्रभावीपणे शेतीप्रणाली निश्चित करता येईल. या प्रक्रियेत आपण कार्यक्षमतेने काही करू शकतो का आणि त्यामध्ये सुधारणा करू शकतो का यावर चर्चा करण्याची दरज आहे.

संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटनेच्या सुचनेनुसार, आपण युनीक उत्पादन व्यवस्थापन प्रणाली स्वीकारली पाहिजे की ज्याद्वारे कृषी परिसंस्थेच्या आरोग्यासह, जैवविविधता, जैविक चक्र आणि जैविक माती व्यवस्थापनाबाबत प्रोत्साहन देते. जैविक, यांत्रिक पद्धतींचा वापर करून हे उद्दीष्ट आपण साध्य करू शकतो. कृत्रिम शेतीपद्धती टाळता येईल. अपेक्षेनुसार शेतीत कार्यक्षमता सुधारता येऊ शकेल. मातीचे आरोग्य जपण्यास आपण प्राधान्य दिले पाहिजे. तरच आपण आपल्या परिसंस्थांचे जतन करून निसर्गाशी सुसंगत शेती करणे शक्य होईल.

एग्री इकोसिस्टम राखण्यासाठी काही महत्त्वाच्या पद्धती-

१) नांगरणीविना शेती ( नो टिलाज - एनटी प्रणाली) -  (याला थेट बी पेरणी, जमिनीचे संरक्षण / संवर्धन शेती असेही म्हटले जाते) आधुनिक शेतीमधील ही प्राथमिक पद्धती मानली जाते की, जमिनीची हानी होण्यापासून संरक्षण करते. त्याचबरोबर आर्थिक परतावाही यातून चांगला मिळतो आणि या पद्धतीचे पर्यावरणीय फायदे खूप आहेत. पारंपरिक नांगरणीच्या ऐवजी मातीची गुणवत्ता राखून त्याचे आरोग्य सुधारणेसाठी मदत करते. या पद्धतीमुळे व्यक्तीचे श्रम, इंधनाची बचत आणि यासाठी लागणाऱ्या उपकरणांची किंमतही कमी असते. एका संशोधनानुसार, या पद्धतीने माती, पाणी आणि जैविक प्रणाली अधिक चांगल्या प्रकारे विकसित होईल. त्यातून मूळ मातीचे संवर्धन होईल.

२. संरक्षक पिके :

याला मातीसाठीची कवच पिके असेही याला म्हणता येईल. शेतीमध्ये घेण्यात येणाऱ्या बारमाही पिकांसह अल्फल्फासारख्या वनस्पतींपासून मातीमधील कार्बन (सी), नायट्रोजन (एन) यांच्या सुधारणेसह स्थिरता निर्माण होईल. या पिकांची लागवड विविध कारणांनी केली जाते. मातीचे संवर्धन करणे, वारा आणि पाण्यापासून होणारी जमिनीची धूप रोखणे आणि मातीची संरचना सुधारण्याचे काम कवच पिके करतात. ओट्स, तेल बियाणे मुळा आणि धान्य राई, वार्षिक रायग्रास, किरमिजी रंगाचे लवंगा अशी कवच पिकांची काही उदाहरणे आहेत.

३. पिकांचा फेरपालट, पीक वैविध्य :

शेतीमध्ये पिकांची फेरपालट केली तर पिकांच्या विविधतेमुळे जमिनीखालील मातीमध्ये सूक्ष्मजीवांची विविधता वाढते. वनस्पतींची विविधता नैसर्गिक शेती प्रणालीमध्ये मातीच्या सूक्ष्मजीव जैवविविधतेच्या सुधारणेस निश्चितच मदत करते. मध्य पेन्सिल्वनियामध्ये झालेल्या एका संशोधनात दीर्घ कालावधीसाठी पीक फेरपालटाबाबत घेतलेल्या चाचणीत असे दिसून आले की रोयाबीनसह रोटेशनचा कालावधी वाढवल्याने कॉर्नचे उत्पादन ७ टक्क्यांनी सुधारले. अल्फल्फा, गवत आणि गवतांनंतर पहिल्या वर्षी १५ टक्के आणि त्यानंतर कॉर्न, ओट्स, गहू, रेड क्लोव्हर गवत अशा पद्धतीमुळे उत्पादन १६ टक्क्यांनी वाढले.

सेंद्रीय शेती सुधारणा :

कंपोस्ट खते आणि व्हर्मी कंपोस्ट यांसारख्या सेंद्रीय पद्धतीच्या सुधारणा संयुक्तपणे केल्या गेल्यास त्या मातीचे आरोग्य सुधारतात. जर कंपोस्ट, खते आणि व्हर्मी कंपोस्ट स्वतंत्रपणे वापरले तर या सुधारणांचा वेग कमी असतो. सेंद्रीय शेती सुधारणांमध्ये नगरपालिकांचे सांडपाणी (एसएस), कोंबडी खत (सीएम), घोड्याचे खत (एचएम), रक्त आणि हाडांचे पदार्थ आणि सर्व खते अशा सुधारणांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमधील पल्ली शिक्षाभवनच्या (अॅग्रीकल्चर इन्स्टिट्यूट) कृषीशास्र विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख ए. के. बारिक यांच्या शोधनिबंधानुसार, पारंपरिक शेतीमुळे पर्यावरणीय खर्च अधिक आहे. त्याचे सेंद्रीय शेतीत रुपांतर करून पर्यावरणीय वातावणात बदल घडवता येतो. पर्यावरणीय वातावरणाला अधिक प्राधान्य दिले जात नाही. प्रकाशित झालेल्या 300 हून अधिक अहवालांच्या पडताळणीत असे दिसून आले आहे की, १८ पर्यावरीय प्रभावांपैकी सेंद्रीय शेती प्रणालीने १२ प्रभावांमध्ये लक्षणीय बदल घडविले आहेत. त्यातून कोणतेही वाईट परिणाम झालेले नाहीत. (रोमेश एट अल 2005). या पद्धतीतून अन्न साखळीतील कीटकनाशके आणि हेवी मेटल्सचा परिणाम कमी करून मानवी आरोग्य जपणुकीचा महत्त्वाचा हेतू आहे. सेंद्रीय शेती प्रणालीमध्ये विविधता आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात उपद्रवी घटक आहेत. भविष्यात संशोधनातून सेंद्रीय प्रमाणीत अधिकाधिक सुधारणा कशा करता येतील यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

English Summary: New farming techniques to improve the Agriculture ecosystem
Published on: 17 September 2020, 05:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)