मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत. कृषी विभाग शेतकऱ्यांना यासाठी जागरूक करत होते जे की यासाठी वेगवेगळी शिबिर अवलंबत जाते मात्र हे प्रत्यक्ष आमलात येत न्हवते पण आता शेतकऱ्यांनी हे आमलात आणले असून हा बदल स्वीकारला आहे. उन्हाळी हंगामात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून खरीप हंगामात जे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीवर भर दिला आहे. जे खरीप हंगामात झाले नाही ते उन्हाळी हंगामात करायचे आहे यासाठी शेतकरी राबराब कष्ट करत आहेत.
बेमोसमी पिकामुळे शंका :-
उन्हाळी हंगामात सोयाबीन चा प्रयोग हा नवीनच आहे जे की एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग राबिवला आहे. उन्हाळी हंगामात हे बेमोसमी पीक घेतले असल्यामुळे सोयबीन पिकाला उतार भेटतोय की नाही अशी शंका सर्व प्राप्त करत आहेत मात्र उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी वर्गाने हे धाडस केले आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल घडवून तर आणलेला आहे मात्र शेतकऱ्यांना पेरणीपासून प्रति टप्यावर आता लक्ष द्यावे लागणार आहे. उन्हाळी हंगामात बीजोत्पादन करून एकात्मिक कीटक व्यवस्थापन केले तर याचा फायदा उत्पादनात होणार आहे.
वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचा भर :-
खरीप हंगामाच्या सुरुवातीस सोयाबीन चे दर कमी होते मात्र मध्यावर चांगला दर भेटला. निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन चे घटलेले उत्पादन आणि दर वाढ झाल्याशिवाय सोयाबीन ची विक्री नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे जे सोयाबीन ४ हजार रुपये वर होते त्याचा दर आता ६ हजार २०० रुपये झाला आहे. मागील काही दिवसांपासून हे दर टिकून राहिले आहेत तसेच पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. एका बाजूला दर तर दुसऱ्या बाजूस अजून १५ दिवस सोयाबीनच्या पेऱ्यावर लागणार आहेत असा अंदाज कृषी तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.
अशा प्रकारे घ्या काळजी :-
बीजोत्पादन एकत्र केल्यास कीटक व्यवस्थापन करणे फायद्याचे ठरणार आहे. तसेच निंबोळी अर्क, बिव्हेरिया बॅसियाना सारखे जैविक तसेच इमामेक्टिन बेन्झाएट, क्लोरअॅट्रनिलीप्रोल यासारखे रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला तर अधिक फायदा होणार आहे असे कृषीतज्ञांचे मत आहे.
Published on: 01 February 2022, 06:14 IST