Agripedia

महाराष्ट्रात शेतकरी प्रमुख पिके म्हणून सोयाबीन

Updated on 14 August, 2022 7:28 PM IST

महाराष्ट्रात शेतकरी प्रमुख पिके म्हणून सोयाबीन कापूस मका या पिकांची निवड करतात त्यामध्ये काही नवीन संकटे येत आहेत ते शेतकऱ्यांना किती त्रासदायक आहे व ते कशाप्रकारे त्रासदायक आहेत हे आपण पिकांनुसार बघुयात.कापूस - मागील काही वर्षांपासून कपाशीवरील मावा,तुडतुडे आणि पांढरी माशी यांना शिफारस असलेली कीडनाशके फवारून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाहीयेत. कारणांचा शोध घेतल्या असता खालील कारणे लक्षात येतात

1.इमिडाक्लोप्रिड व इमिडाक्लोप्रिड सहित असणारे संयुक्त कीडनाशकांची गरज नसताना फवारणीSpraying when there is no need for joint pesticides including Imidclubid and Imidclid 2.लेबल क्लेमनुसार शिफारशी प्रमाणे फवारणी न करता दुप्पट तिप्पट प्रमाण वापरणे3.शिफारस नसलेली कीडनाशके फवारणी 4.सिंथेटिक पायरेथ्राइड गटातील नोव्हेंबर महिन्यानंतर फवारणी करण्याची औषधे सुरुवातीच्या काळातच फवारणी करणे.5.शेंदरी बोंड अळी प्रमाणेच रसशोषक किडीवर देखील मोठ्या प्रमाणावर पीक संरक्षण खर्च होत आहे.

6.शेंदरी बोंडअळी प्रादुर्भावामुळे पूनर्बहर/फरदड घेण्यावर मर्यादा आल्याने उत्पादनात घट7.पीक उत्पादन खर्चात मोठी वाढ 8.कीडनाशकात पीजीआर/विद्राव्य खते/टॉनिक मुळाद्वारे द्यायचे ह्यूमिक एसिड इत्यादी मिसळणे सोयाबीन 1.उन्हाळी सोयाबीन मुळे पिवळा मोझाक विषाणू रोग वाढता प्रादुर्भाव 2.पर्यायाने प्रादुर्भाव झालेले दूषित बियाण्यांचे पिढ्या होऊन पीक मोठ्या अडचणीत सापडणार आहे.

3.गोगलगाय संकट 4.पीक उत्पादन खर्चात मोठी वाढ मका 1.लष्करी अळी, पीक निघेपर्यंत 4-5 फवाराण्या घ्याव्या लागतात.आश्चर्य म्हणजे कृषी रसायने कंपनी जाहिरात करताना एकरी डोस जाहिराती मध्ये छापत नाहीत. त्याचे कारण सांगायला त्यांना लेबल क्लेम चे नाव आहेच की.शेतकरी लेबल क्लेम विषयक जागरूक नाही.

अशा या सर्व कारणांमुळे प्रमुख पिके मोठ्या संकटात सापडले आहेत. यात शेतकरी तर जबाबदार आहेच पण कृषी रसायने विकणारे तेव्हढेच जबाबदार आहेत. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, विद्यापीठ हे शिफारशी प्रमाणे मार्गदर्शन करतात पण त्याकडे शेतकरी बांधव दुर्लक्ष करतात. कृषी रसायने

विकणारे व्यापार करतात, शेतकरी यांच्या आर्थिक अडचणी असल्याने जो दुकानदार उधार देईल त्याकडे त्याच्या सल्ल्याप्रमाणे खरेदी करतात.त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेत कोण एक जबाबदार नसून सर्वांची जबाबदारी समान आहे. सावध ऐका पुढल्या हाका.या लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून ती प्रत्येकाला पटावीच असे नाही.

English Summary: New crises in major crops lead us here and it has to be planned accordingly
Published on: 14 August 2022, 07:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)