Agripedia

छोटे छोटे व्यवसाय खूप काही तरी देऊन जातात हे एक सत्य आहे. एखादा व्यवसाय करायचा म्हणून काहीतरी सुरुवातीपासूनच भव्यदिव्य असे काहीतरी करण्याची गरज नसते.

Updated on 11 June, 2022 9:45 PM IST

 छोटे छोटे व्यवसाय खूप काही तरी देऊन जातात हे एक सत्य आहे. एखादा व्यवसाय करायचा म्हणून काहीतरी सुरुवातीपासूनच भव्यदिव्य असे काहीतरी करण्याची गरज नसते.

अगदी छोट्यात छोट्या प्रमाणामध्ये एखाद्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली तरी ती कालांतराने हळूहळू वाढत जाऊन खूप फायदा देते. आता तसे पाहायला गेले तर शेतीमध्ये सुद्धा  बऱ्याचदा भाजीपाला पिकाचा विचार केला तर अगदी कमी कालावधीत येणारी पिकांची लागवड शेतकऱ्यांना खूपच कमी खर्चा मध्ये चांगला भरगच्च नफा देऊन जाते.

आता आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर यामध्ये बऱ्याच प्रकारची पिके शेतकरी घेतात. पण या भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये काकडी ही असे पिक आहे, कमीत कमी कालावधीत आणि कमीत कमी खर्चात लाखो रुपयांचा नफा देते.

तसे पाहायला गेले तर काकडी मध्ये भरपूर प्रकारचे वाण आहेत. परंतु यामध्ये नेदरलँड काकडी हा बिया नसलेला  वाण खूपच उपयुक्त ठरतो. काकडी लागवडतुन तुम्ही अगदी काही महिन्यांच्या आत लाख रुपये कमवू शकतात.फक्त गरज आहे व्यवस्थित बाजारपेठेचे निरीक्षण करून लागवड करण्याची.

नक्की वाचा:Technology: वाळलेली फुले आणि पाने वाढवतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, नवीन तंत्रज्ञान विकसित

 काकडी लागवडीची सर्वसाधारण माहिती आणि गणित

 काकडी लागवडीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करू शकतात. अगदी वालुकामय माती असो या गाळाची,काळी माती तसेच चिकन माती मध्ये देखील हे पीक चांगले येते.काकडीची लागवड तुम्ही गावापासून शहरापर्यंत कुठेही करू शकतात.

साधारण  वर्षभर चांगल्या प्रकारे मागणी असलेले हे भाजीपाला पीक असून त्याला प्रचंड मागणी आहे.तसेच आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तरी ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.काकडीचे पीक लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांत तयार होते.

आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे काकडी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लावली जाते. उन्हाळ्यामध्ये काकडीला खूपच मागणी असते. ज्या जमिनीचा सामू साडेपाच ते 6.8 आहे अशा जमिनीत काकडी लागवड करता येते. नदी नदी आणि तलावाच्या काठावर देखील हे पीक चांगले येते.

नक्की वाचा:हमखास पैसे देणारे पीक, वर्षातून तीनही हंगामांत देऊ शकतो घेवडा पीक

सरकार कडून शेडनेट साठी अनुदान घेऊन तुम्ही काकडी लागवड चांगल्या पद्धतीने करू शकता

 एका मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश राज्यातील एका शेतकऱ्याने  चार महिन्यात आठ लाखांचे उत्पन्न काकडी लागवडीतून मिळवले.या शेतकऱ्यांनी नेदरलॅंडमधील म्हणजेच नेदरलँड जातीची काकडीची लागवड केलेली होती.

या काकडी चे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बिया नसतात व याच कारणामुळे मोठ्या मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये याला खूप मोठी मागणी असते. हेच या शेतकऱ्याला फायद्याचे झाले व त्याने शासनाकडून अठरा लाख रुपयांचे अनुदान घेऊन शेडनेट उभारले त्यात काकडी लागवड केली.

आता काकडीच्या इतर वाणांच्या दराची तुलना नेदरलँडच्या  बियाण्याच्या काकडी सोबत केली तर दरात दुप्पट चा फरक पडतो.

जर काकडीच्या इतर वानांची किंमत 20 रुपये प्रति किलो असेल तर नेदरलँड काकडीचे दर हे प्रति किलो 40 ते 45 रुपये असतात. जर तुम्ही यामध्ये सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून मार्केटिंग केली तर खूपच जास्त प्रमाणात यामध्ये नफा मिळू शकतो.एका कडेला वर्षभर चांगली मागणी असते. कारण हॉटेलमध्ये सलाड आणि कोथिंबीर साठी या काकडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

नक्की वाचा:Veriety Special: रोगप्रतिबंधक, दुष्काळ प्रतिरोधक क्षमता असलेले सोयाबीनचे 'हे'वाण देतील शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन

English Summary: netherland cucumber cultivation is so benificial for farmer to make profit
Published on: 11 June 2022, 09:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)