थोडं थोडं सेंद्रिय शेती मध्यला काही भाग समजुन घेणे आवश्यक आहे जसे कडुनिंबाच्या बि त्या पासून बनविलेल निंबोळी पावडर पिकांसाठी संजीवनी व सुतकृमी नाशक ! आता या निंबोळी चा शेतामधे फायदा जाणून घेऊया मित्रांनो ही माहिती साधारण वाटेल पण शेती च्या दृष्टीने महत्त्वाची आहे
सेंद्रिय शेती रेसिड्यूफ्री शेती, नैसर्गिक शेऊ, जैविक शेती, एकात्मिक शेती, रासायनिक शेती अशा सर्वच शेती प्रकारामध्ये वापरण्यात येणाऱ्या निंबोळी पावडर चे कार्य व अनेक फायदे आहेत ते वापरण्यास सुरक्षित आहे व सध्या रासायनिक निविष्ठांना सुयोग्य पर्याय
म्हणून निंबोळी पावडर चा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहेत.आता पाहुयात निंबोळी पावडर चे कार्य कोणकोणते व फायदे जाणून घेऊया.
निंबोळी पावडरचा फायदा
अॅझाडीरेक्टीन’ घटक सर्वाच्या परीचयाचा आहे हे सांगण्यासाठी काही नवं नाही. मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी, विषाणु,बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.निंबोळी च पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने
जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.त्याच बरोबर निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.
निंबोळी पावडर हे पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.
निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.निंबोळी पावडर कसे वापरालसर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.
फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.त्याच बरोबर उन्हाळ्यात किंवा पेरणीपूर्वी जमिनीत दिल्यास जमिनीचा पोत सुधारतो.सांगण्याचे तात्पर्य हेच की निंबोळी पावडर,अर्क,तेल, संपूर्ण आपल्या उपयोगी पडणारे आहे पण आपन हे सर्व काळानुसार विसरत चाललो आहे..
विचार बदला जिवन बदलेल
Save the soil all together
माती वाचवा..!
आपला मित्र
मिलिंद जि गोदे
9423361185
Published on: 28 April 2022, 07:31 IST