Agripedia

कडुलिंब हि एक आवती भोवती सर्व ठिकाणी असणारे सर्वगुण संपन्न वृक्ष आहे. याला धार्मिक महत्व हि लाभलेले आहे म्हणुन याचा वापर गुढी पाढवा सनाला हि करतात.

Updated on 28 October, 2021 7:30 PM IST

तसेच सेंद्रीय शेती मध्ये हि कडुलिंब महत्वाची भुमिका बजावते. 

कडुलिंब १ gram बियामध्ये 2 ते 4 मिली gram एझाडिराकटीन असते. 

कडुलिंब मध्ये निम्बीन व निम्बीडिन - विषाणुरोधक असते. 

कडुलिंब मध्ये मेलयान ट्रिओल असते यामुळे पिकाला किड खाऊ शकत नाही. 

 कडुलिंब मधील सालान्निन - किडींना अपंगत्व आणते. 

 

कडुलिंब आवयवांचा वापर

1) कडुलिंब बियापासुन ~ लिंबोळी पेंड/भरडा, लिंबोळी अर्क, लिंबोळी तेल. 

2) कडुलिंब पानापासुन ~ पानाचा अर्क, 

3) पानाच्या देठा पासुन ~ लिंबकड्या अर्क. 

 

 कडुलिंबाचे फायदे

1) पिकासाठी किडनाशक, रोगनाशक, तसेच खत/टॉनिक म्हणून उत्तम प्रकारे काम करते. 

2) पिकासाठी बाधक असलेल्या ~ सुञकृमी, हुमणी, हानीकारक बुरशी, जिवाणु, उंदीर इत्यादि चे नियंत्रण उत्तम प्रकारे करते. 

3) मानवी शेकडो अाजार कमी करण्याचे काम करते. 

4) रासायनिक खताचा कार्यक्षम रित्या पिकाला वापर करण्यास मदत करते.

5) शेतीचा खर्च कमी होतो. 

आगोदरच्या काळी शेतकरी कडुलिंबाच्या भरड्याचा खत म्हणुन वापर करत होते. किटकनाशक म्हणून लिंबोळी अर्क वापरत होते. म्हणून शेतावरती किडनियंञन करण्याचे काम मिञ किडी फुकटात करत होत्या. 

 

- अंगद हाजगुडे

    शेती व आरोग्य अभ्यासक

English Summary: Neem is an evergreen Tree
Published on: 28 October 2021, 07:30 IST